बीएमसीचा डिचोली शहरासाठी नवा संकल्प, जनतेकडून मागवला अभिप्राय

बचत गट, शाळकरी मुले, नागरिक आणि संबंधित वॉर्डातील नगरसेवकांकडून मिळालेल्या घोषणांच्या आधारे हा ठराव घेण्यात आला
BMC resolves to declare Bicholim as garbage free town, seeks feedback from public within 15 days
BMC resolves to declare Bicholim as garbage free town, seeks feedback from public within 15 days Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली नगर परिषदेने (BMC) आपले सर्व 14 वार्ड कचरामुक्त प्रभाग आणि शहर कचरामुक्त शहर म्हणून घोषित करण्याचा संकल्प केला आहे. याबाबत नागरिकांकडून येत्या 15 दिवसांत अभिप्राय, सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत. बचत गट, शाळकरी मुले, नागरिक आणि संबंधित वॉर्डातील नगरसेवकांकडून मिळालेल्या घोषणांच्या आधारे हा ठराव घेण्यात आला आहे, असे डिचोली (Bicholim) बीएमसीने जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये म्हटले आहे. “निर्धारित वेळेत कोणताही अभिप्राय/सूचना/आक्षेप प्राप्त न झाल्यास, वर नमूद केलेले सर्व वॉर्ड कचरामुक्त वॉर्ड/कचरामुक्त शहर म्हणून घोषित केले जातील,” नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे.

BMC resolves to declare Bicholim as garbage free town, seeks feedback from public within 15 days
दुसऱ्या दिवशी ही पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ, काँग्रेस आक्रमक

दरम्यान, मडगाव महानगरपालिकेच्या उद्यानासमोर असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्थलांतरण फातोर्डा येथील नव्या संकुलात करण्यात आले आहे. मात्र काही सरकारी कार्यालये अजूनही या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत सुरु आहेत. त्यांची कागदपत्रे या ठिकाणी अस्ताव्यस्त पडली असून त्यामुळे परिसरात कचऱ्याचं साम्राज्य असल्याचं दिसत आहे.

जुन्या जिल्हाधिकारी (Collector) कार्यालय परिसरात ई कचऱ्याचे डोंगर साचले आहेत. अशा प्रकारे येथील सरकारी कार्यालयांची दैना झाली आहे. या इमारतीला चार मजले असून याठिकाणी एकंदरीत 6 सरकारी कार्यालये आहेत. यातील अनेक कार्यालयातील कचरा (Garbage) बाहेरच टाकण्यात येतो. त्यामुळेच परिसरात कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com