Goa University Dainik Gomantak
गोवा

Goa University: उच्च शिक्षण स्तरावरही यंदापासून नवे धोरण

कुलगुरू मेनन : 29 मे पासून ऑनलाईन पोर्टल अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रम नोंदणीसाठी खुले

गोमन्तक डिजिटल टीम

Goa University आगामी शैक्षणिक वर्षापासून गोवा विद्यापीठ  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण  अंमलात आणणार आहे.  29 मे पासून गोवा विद्यापीठ ऑनलाईन पोर्टल अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमासाठी खुले करणार आहे.

या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल अधिक माहितीसाठी तीन शिक्षकांची नावे आणि संपर्क माहिती महाविद्यालयांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरिलाल  मेनन यांनी दिली. 

बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत कुलगुरू प्रो. मेनन म्हणाले की, आगामी शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण गोवा विद्यापीठ अंमलात आणणार आहे.

या धोरणांतर्गत महाविद्यालयीन  अभ्यासक्रम चार वर्षांचा असेल. तो पूर्ण केल्यास ऑनर्सची पदवी आणि त्याहून कमी वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास अनुक्रमे प्रशस्तिपत्र, डिप्लोमा आणि डिग्री दिली जाईल.

या धोरणानुसार शैक्षणिक अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम निवडण्याचा आणि शिकण्याची मुभा असेल. 

हे आहे फायदे

या शैक्षणिक धोरणाचे फायदे विचारले असता, लोलयेकर म्हणाले की, नवीन धोरणात विद्यार्थ्यांना अनेक पर्याय उपलब्ध असतील. महाविद्यालयाबाहेरील विषय शिकण्याची सवलत, दैनंदिन व्यवहारात फायदेशीर शिक्षण तसेच उच्च दर्जाचे शिक्षण यांचा समावेश असेल.

नवीन धोरणानुसार, विद्यार्थ्याने सर्व सेमिस्टरमध्ये 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले तर तो पोस्ट ग्रॅज्युएशन न करता थेट डॉक्टरेटच्या अभ्यासाचा पर्याय निवडू शकतो.

विद्यार्थ्यांना एकाधिक प्रवेश आणि निर्गमनांना अनुमती दिली जाईल, ज्यामध्ये विद्यार्थ्याने शैक्षणिक क्रेडिट्स पूर्ण केल्यास पात्रतेनुसार कोणताही विषय निवडता येईल.

नवीन रचनेत एक प्रमुख, एक कनिष्ठ, एक विषय बहुविद्याशाखीय पर्यायातून, एक विषय मूल्यवर्धित श्रेणीतून, कौशल्यावर आधारित श्रेणी आणि एक भाषा विद्यार्थ्यांना निवडता येईल.

महाविद्यालयात एखादा विशिष्ट विषय नसेल आणि शेजारच्या महाविद्यालयात तो विषय उपलब्ध असेल, तर विद्यार्थ्याकडे तो विषय निवडण्याचा पर्याय उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांच्‍या संख्‍येनुसार त्या विशिष्‍ट महाविद्यालयातील विषय शिक्षक उपलब्‍ध असतील.

शिक्षणाचे महत्त्वपूर्ण टप्पे

उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर म्हणाले की, सध्याच्या शैक्षणिक धोरणात जर एखाद्या विद्यार्थ्याने पदवी अभ्यासक्रमाचे पहिले किंवा दुसरे वर्ष पूर्ण केले तर त्याला तिसरे वर्ष पूर्ण केल्याशिवाय पदवी मिळत नाही.

परंतु नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्याने पहिले वर्ष पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र, दोन वर्षांसाठी डिप्लोमा, तीन वर्षांसाठी पदवी आणि चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास ऑनर्स पदवी मिळेल. ऑनर्ससह पदवी पूर्ण करणारा विद्यार्थी डॉक्टरेट अभ्यास सुरू ठेवू शकतो.

विद्यार्थ्यांना अनेक पर्याय उपलब्ध

यापूर्वी तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्याला पदवी प्राप्त होत असे. परंतु नवीन धोरणांतर्गत विद्यार्थ्याला तीन वर्षांचा अभ्यासक्रम निवडायचा किंवा चार वर्षे पूर्ण करून ऑनर्स पदवी मिळवायची, असे अनेक पर्याय उपलब्ध असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT