Margao Municipality Dainik Gomantak
गोवा

Margao News: बेकायदेशीर विक्रेत्यांवर कारवाई करा; मडगावात व्यावसायिकांची मागणी

New Market Vendors Association: विक्रेते मडगावमधील सर्व रस्ते व्यापून टाकतात यामुळे पादचाऱ्यांनाही चालण्यास त्रास होत असल्याचे या शिष्टमंडळाने नगराध्यक्षांच्या नजरेस आणून दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव येथील न्यू मार्केट विक्रेते संघटनेच्या पदाधिकारी व दुकानदारांनी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर तसेच मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांची भेट घेऊन मडगावमधील बेकायदेशीर विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. हे विक्रेते मडगावमधील सर्व रस्ते व्यापून टाकतात. यामुळे पादचाऱ्यांनाही चालण्यास त्रास होत असल्याचे या शिष्टमंडळाने नगराध्यक्षांच्या नजरेस आणून दिले.

आम्ही नगरपालिकेला भाडेपट्टी भरतो, कर भरतो. या बेकायदेशीर विक्रेत्यांकडून नगरपालिकेला कोणतीही आर्थिक आवक होत नसताना आम्हाला त्रास सोसावा लागत आहे. आमच्याकडे गिऱ्हाईक फिरकत नसल्याने आम्हाला नुकसानीला तोंड द्यावे लागत असल्याचेही या शिष्टमंडळाने नगराध्यक्षांना सांगितले. नगराध्यक्षाने त्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्र्वासन दिले.

दरम्यान, दुकानदारांनी पालिकेने व्यापारी परवाना देण्याची मागणी केल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी संगितले की, सर्वप्रथम मार्केटचे सर्वेक्षण करून योग्य माहिती मिळवली जाईल. त्यानंतर कार्यवाही केली जाईल.तसेच आपण याविषयात खास लक्ष देणार असल्याचेही शंखवाळकर यांनी सांगितले.

सुरक्षेला प्राधान्य द्यावे

न्यू मार्केटमध्ये आग विझविण्यासाठी कसलीही व्यवस्था नाही. आम्ही पाण्याच्या टाकीची मागणी केली आहे. पालिकेने न्यू मार्केटमधील विक्रेते व गिऱ्हाईकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे.

जिथे जिथे हे बेकायदेशीर विक्रेते बसतात त्या जागा आम्ही नगराध्यक्षांच्या लक्षात आणून दिल्या आहेत. पहाटे फळे विक्रेते येऊन मार्केटबाहेरील रस्ता व्यापून टाकतात व ते ८ वा.नंतरही असतात.

न्यू मार्केटमधील विक्रेत्यांना त्यांच्या दुचाकी पार्क करता येत नाहीत. या विक्रेत्यांना सकाळी ८ वा.पूर्वी तिथून हटविण्याची मागणी केल्याचे न्यू मार्केट विक्रेते संघटनेचे अध्यक्ष गोपाळ नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT