Lighthouse in Goa Dainik Gomantak
गोवा

Lighthouse in Goa : कांपाल येथे अत्याधुनिक लाईटहाऊस!

लवकरच उभारणी; सुमारे अडीच कोटींचा प्रकल्प; बंदर कप्तान खात्याची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Lighthouse in Goa : केंद्र सरकारने किनारी राज्यांमध्ये लाईटहाऊस पर्यटनाला वाव देण्यासाठी नवीन लाईटहाऊस बांधण्याचे धोरण तयार केले आहे. याचा भाग म्हणून गोवा सरकार देखील आंतरिक जलमार्गांवर नवीन लाईटहाऊस बांधून पर्यटकांना आकर्षित करणार आहे. राज्यातील जीर्ण स्थितीत असलेली लाईटहाऊस बंदर कप्तान खात्याने नोंद केली असून ती जमीनदोस्त करून त्या ठिकाणी नवीन लाईटहाऊस बांधण्याचा विचार सुरू आहे.

कांपाल येथे कला अकदामीच्या मागे असलेले लाईटहाऊस जीर्ण स्थितीत असल्याने धोकादायक अवस्थेत आहे. या जागी नवीन अत्याधुनिक सुविधा असलेले लाईटहाऊस लवकरच बांधले जाईल. याची फाईल सध्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठवण्यात आली असून, नियोजन तयार करण्यात आला आहे. सुमारे 2.50 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असणार आहे. यासाठी संपूर्ण निधी भारतीय आंतरिक जलमार्ग प्राधिकरणामार्फत (आयडब्लूएआय) आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती बंदर कप्तान खात्याने दिली आहे.

दरम्‍यान, कला अकादमीच्या मागे असलेल्या लाईटहाऊसची स्थिती खूपच वाईट असल्याने येथील कर्मचाऱ्यांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे.

अशी असेल लाईटहाऊसची रचना

एकूण सात मजल्यांचे लाईटहाऊस असणार असून, त्यात विविध भाग केले आहे. तळमजला येथे पॅन्ट्री (अन्य धान्य गृह) असणार आहे. पहिल्या मजल्यावर बॅटरी कक्ष, दुसऱ्या अणि चौथ्या मजल्यावर पर्यटकांसाठी डेक लेव्हल असेल. यात विशेष म्हणजे हे पूर्ण काचेचे असणार आहे, जेथे जाऊन पर्यटकांना विहंगम दृश्य बघता येईल. सातव्या मजल्यावर लाईटहाऊसचे नियंत्रण कक्ष असणार आहे. पर्यटकांचा आकर्षित करण्यासाठी, तसेच जलवाहतुकीस मदत होईल, असे हे लाईटहाऊस होणार आहे.

राज्यातील प्रमुख लाईटहाऊस

  • आग्वाद

  • कांपाल

  • पेन्ह द फ्रान्स

  • तेजो (पुढे आणि मागे)

  • रेईशमागूस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budget Friendly India Tour: दिल्ली, गोवा, जयपूर...14 दिवसांत भारत दर्शन; कसा कराल बजेटफ्रेन्डली प्रवास? वाचा प्लॅन

Mumbai Goa Highway: पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर दिसली जखमी मगर, मुसळधार पावसाचा वन्यजीवांना धोका

Operation Sindoor: पाकिस्तानच्या ‘पळपुट्या' नौदलाची पोलखोल! ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौका ग्वादर बंदरात लपवल्या; सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

Goa Live News: विहिरीत पडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना यश

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

SCROLL FOR NEXT