Buses  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 'KTCL'चा नवा उपक्रम; दिव्यांग लोकांचा प्रवास होणार सुखद

100 लो-फ्लोअर इलेक्ट्रिक बसेस डिसेंबर पर्यंत गोव्यात दाखल होतील

दैनिक गोमन्तक

पणजी: दिव्यांग लोकांना बस प्रवास सुखद आणि सोयीस्कर करण्यासाठी कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडने (KTCL) दिव्यांग-अनुकूल बसेस मागवल्या आहेत. यातील 100 लो-फ्लोअर इलेक्ट्रिक बसेस डिसेंबर पर्यंत गोव्यात दाखल होतील, अशी माहिती समोर आली आहे.

महामंडळाने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये (32-34) आणि (52-54) आसनक्षमता असलेल्या 500 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा, संचालन आणि दैनंदिन देखभालीसाठी निविदा मागवल्या होत्या. महामंडळाने गोव्यातील (Goa) उपनगरे आणि ग्रामीण भागात तसेच शेजारील राज्यांच्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर या नवीन ई-बस चालविण्याचे नियोजन केले आहे.

“अपंगत्व हक्क असोसिएशन ऑफ गोवा बरोबरच्या बैठकींच्या मालिकेनंतर आम्ही हायड्रोलिक स्टॅकर लिफ्टचा एक नमुना विकसित करण्याचा निर्णय घेतला जो 146 KTC बसेसमध्ये (Bus) वापरला जाऊ शकतो. याच्या मदतीने दिव्यांग व्यक्तींना बसमध्ये चढताना आणि उतरताना गैरसोय होणार नाही. हे मशिन तयार करण्यासाठी आम्हाला 50,000 रुपये खर्च आला," असे KTC सरव्यवस्थापक एस.एल. घाटे म्हणाले.

सुलभ भारत योजनेंतर्गत सर्व बसस्थानकांवर बसवल्या जाणार्‍या व्हीलचेअर उचलण्यात वेळ जातो. ही वेळ वाचवण्यासाठी प्रत्येकी 1.80 लाख रुपये किमतीचे बॅटरीवर चालणारे हायड्रोलिक स्टॅकर्स खरेदी करण्यासाठी महामंडळ आता समाजकल्याण विभागाकडून आर्थिक मदत घेणार असल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'हा अपघात नव्हे, 25 जणांचा खून! हडफडे नाईटक्लब दुर्घटनेवरून आमदार लोबो संतापले; Watch Video

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा 'चॅप्टर' कोणी 'क्लोज' केला?

नाताळची लगबग सुरू! सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या, दर 10 टक्क्यांनी वाढले

हडफडे क्लब आगीतील 3 मृतदेहांवर झारखंडमध्ये अंत्यसंस्कार; सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत

गोवा-शिर्डी, गोवा-तिरुपती थेट विमानसेवा सुरू करावी, सदानंद शेट तानावडेंची राज्यसभेत मागणी

SCROLL FOR NEXT