Hotel GST Goa 2025 Canva
गोवा

Goa Hotel GST: गोव्यातील हॉटेल, रेस्टॉरंट संदर्भातील सेवा करात बदल! काय आहे नवी रचना; माहिती घ्या

Restaurant tax Goa April 2025: हॉटेलमधील ‘निर्दिष्ट जागांमध्ये’ दिल्या जाणाऱ्या रेस्टॉरंट सेवा संदर्भातील सुधारित वस्तू आणि सेवा कर संरचना १ एप्रिल २०२५ पासून लागू करण्यात आली आहे.

Sameer Panditrao

पणजी: ज्या हॉटेलांमध्ये कुठल्याही खोलीचे दर ७ हजार ५०० रुपये किंवा अधिक आहेत, अशा ठिकाणी दिल्या जाणाऱ्या रेस्टॉरंट सेवांवर आता १८ टक्के वस्तू व सेवा कर (इनपुट टॅक्स क्रेडिटसह) आकारण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला, स्वतंत्र रेस्टॉरंट्सवर ५ टक्के वस्तू व सेवा कर (इनपुट टॅक्स क्रेडिट शिवाय) लागू राहील.

हॉटेलमधील ‘निर्दिष्ट जागांमध्ये’ दिल्या जाणाऱ्या रेस्टॉरंट सेवा संदर्भातील सुधारित वस्तू आणि सेवा कर संरचना १ एप्रिल २०२५ पासून लागू करण्यात आली आहे. अधिक स्पष्टता मिळावी यासाठी जीएसटीएन कडून एक सामान्य प्रश्नोत्तर संच जारी करण्यात आला आहे.

याला केंद्रीय जीएसटी अंमलबजावणी समितीने मंजुरी दिली असून, तो व्यापारी परिपत्रकाद्वारे सर्व राज्ये, नोंदणीकृत करदाते आणि केंद्रीय तसेच गोवा जीएसटी कायद्यान्वये कार्यरत अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.

एकल रेस्टॉरंट्सना फायदा

या नवीन कररचनेमुळे ग्राहक आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्याय म्हणून एकल रेस्टॉरंट्सना पसंती देतील. विशेषतः मध्यमवर्गीय व नियमित बाहेर जेवणाऱ्यांसाठी ही मोठी बचत ठरणार आहे. परिणामी, एकल रेस्टॉरंट्सची लोकप्रियता आणि ग्राहकवाढ निश्चित होणार आहे. त्यांना अधिक व्यवसाय मिळण्याची आणि स्पर्धेत टिकून राहण्याची संधी वाढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT