Goa airport flight services to Indian and European cities
पणजी: दाबोळी आणि मोपा विमानतळावरून १२ भारतीय व २६ युरोपीय शहरांदरम्यान विमानसेवा उपलब्ध केली जाणार आहे. एअर इंडिया आणि लुफ्तान्सा समूहाने कोडशेअर भागीदारीचा विस्तार करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे हे शक्य होणार आहे. ६० नवीन मार्गांवर दाबोळीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आणि मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे.
या नवीन कराराअंतर्गत, एअर इंडिया आता ऑस्ट्रियन एअरलाईन्ससोबत नवीन कोडशेअर करार करणार आहे आणि लुफ्तान्सा व स्वीससोबतच्या विद्यमान करारांचा विस्तार करण्यात येणार आहे. या भागीदारीमुळे भारतीय उपखंड आणि युरोपदरम्यान ६० नवीन कोडशेअर मार्ग सुरू होतील. ज्यामुळे प्रवाशांना अधिक उड्डाण पर्याय आणि उत्तम जोडणी उपलब्ध होईल.
ऑस्ट्रियन एअरलाईन्ससोबत नवीन करार केल्यामुळे २६ नवीन मार्ग जोडले जातील. यामुळे गोमंतकीय प्रवाशांसाठी युरोप आणि अमेरिका प्रवास अधिक सोयीस्कर होईल. एअर इंडिया आता युरोपमधील २६ आणि अमेरिकेमधील ३ शहरांमध्ये उड्डाणे सुरू करणार आहे. लुफ्तान्सा ग्रुपचे प्रवासी आता एअर इंडियाच्या १५ ठिकाणांशी जोडले जातील, ज्यात दाबोळी आणि मोपाचा समावेश आहे.
लुफ्तान्सा : फ्रँकफुर्टहून - ॲमस्टरडॅम, बार्सिलोना, बर्लिन, ब्रसेल्स, डब्लिन, म्युनिक, ओस्लो, प्राग, स्टॉकहोम, वॉशिंग्टन डीसी आणि इतर.
स्वीस : झ्युरिकहून - ॲमस्टरडॅम, बर्लिन, ब्रसेल्स, म्युनिक, ओस्लो, स्टॉकहोम आणि इतर.
ऑस्ट्रियन एअरलाईन्स : व्हिएन्नाहून - ॲमस्टरडॅम, बार्सिलोना, बर्लिन, ब्रुसेल्स, म्युनिक, ओस्लो आणि इतर.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.