Vasco Fish Market Dainik Gomantak
गोवा

Vasco Fish Market: वास्कोतील नवीन मासळी मार्केटकडे विक्रेत्यांची पाठ! पालिकेचा आदेश धाब्यावर; मुख्याधिकाऱ्यांचा कारवाईचा इशारा

Vasco Latest News: पालिकेने नवीन मासळी मार्केट बांधले आहे. या मार्केटाचे उद्‍घाटन कधी होणार आहे? हे मार्केट पांढरा हत्ती तर होणार नाही ना? असे विविध प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: नवीन मासळी मार्केटात सोमवारपासून (ता. २९) मासेविक्री करावी, असा आदेश मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी काढला असतानाही मासे विक्रेत्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे येथे विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याबाबत नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी सांगितले की, आम्ही आणखी दोन दिवस वाट पाहणार आहोत, त्या दरम्यान मासे विक्रेत्यांनी नवीन मार्केटात स्थलांतर केले तर ठीक आहे, नाही तर आम्हाला पुढील कारवाई करावी लागेल, असे ते म्हणाले.

पालिकेने नवीन मासळी मार्केट बांधले आहे. या मार्केटाचे उद्‍घाटन कधी होणार आहे? हे मार्केट पांढरा हत्ती तर होणार नाही ना? असे विविध प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत होते. हे मार्केट जीसुडाने सष्टेंबर महिन्यात मुरगाव पालिकेकडे हस्तांतरित केले होते. दोन वेळा उद्‍घाटनाची तारीख घोषित करूनही उद्‍घाटन न झाल्याने हे मार्केट चर्चेत आले होते.

नवीन मार्केटात मासळी विक्रेत्यांनी स्थलांतर करण्याची गरज होती, मात्र आमच्या काही मागण्या पूर्ण करण्यात आल्या नसल्याचा दावा करत मागण्या पूर्ण झाल्यावरच आम्ही तेथे स्थलांतर करू असे मासळी विक्रेत्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात आल्या.

दरम्यान, मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी मासळी विक्रेत्यांनी मार्केटमध्ये स्थलांतरित व्हावे, असा आदेश काढला. तसेच मार्केटाची देखभाल कोण करणार, तेथील जागावाटप लॉटरी पद्धतीने केले जाईल, तेथे मासे विक्रेत्यांसह पूर्वीच्या भाजी, फळे, नारळ विक्रेत्यांनाही सामावून घेतले जाईल, मार्केट आराखड्यामध्ये गरजेनुसार बदल करण्यात येईल वगैरे गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या होत्या.

सध्या ज्या जागेवर मासे विक्री करण्यात येत आहे, ती जागा २८ डिसेंबरपर्यंत खाली करून मासळी विक्रेत्यांनी आपले साहित्य नवीन मार्केटात न्यावे असे आदेशात म्हटले होते. २९ पासून नवीन मार्केटात मासे विक्री करण्यासंबंधीही निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे वास्कोवासिय सुखावले होते. मासळी मार्केट २९ पासून सुरू होणार या प्रतीक्षेत लोक होते.

परंतु सोमवारी मार्केट सुरू झाले नाही की मासळी विक्रेत्यांनी आपली जुनी जागा खाली केली नाही. त्यामुळे त्या मासळी विक्रेत्यांनी पालिकेसमोर आव्हान उभे केली काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मार्केटात स्थलांतर करण्यासंबंधी मासळी विक्रेत्यांनी पालिकेशी कोणताही संपर्क साधला नाही. त्यामुळे ते आदेशासंबंधी गंभीर नसल्याचे दिसून येते.

याबाबत नगराध्यक्ष बोरकर यांना विचारले असता, मासळी विक्रेत्यांच्या काही अडचणी होत्या, तर त्यांनी आमच्यासमोर मांडल्या पाहिजे होत्या असे स्पष्ट केले. मासळी विक्रेत्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आम्ही आणखी दोन दिवस वाट पाहणार असल्याचे बोरकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT