Goa new ferry boats Dainik Gomantak
गोवा

Goa Ferryboat: गोमंतकीयांसाठी खुशखबर! राज्‍यात नवीन 5 फेरीबोटी लवकरच येणार; 2 बोटी डिसेंबरपर्यंत सेवेत

Goa New Ferryboats: नांगरून ठेवलेली फेरीबोट बुडणे, फेरीबोट भरकटणे, फेरीबोट मध्‍येच बंद पडणे असे प्रकार अलीकडे वाढू लागले आहेत. त्‍यामुळे प्रवाशांमध्‍ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Sameer Panditrao

पणजी: नांगरून ठेवलेली फेरीबोट बुडणे, फेरीबोट भरकटणे, फेरीबोट मध्‍येच बंद पडणे असे प्रकार अलीकडे वाढू लागले आहेत. त्‍यामुळे प्रवाशांमध्‍ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर नदीपरिवहन खात्‍याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांच्‍याशी ‘गोमन्‍तक’ने संपर्क साधला असता त्‍यांनी गोमंतकीयांना आश्‍‍वस्त करण्‍याचा प्रयत्‍न केला.

ते म्‍हणाले, आणखी दोन नवीन फेरीबोटी डिसेंबरपर्यंत सेवेत दाखल होणार आहेत. त्याचबरोबर तीन जुन्या फेरीबोटींऐवजी तेवढ्याच नवीन फेरीबोट खरेदी करण्यासाठी ई-टेंडरिंग प्रक्रिया सुरू केली आहे.

राज्यातील जलमार्गांवर सुरू असलेल्‍या आणि सर्वांत जास्त तोट्यात असलेल्या फेरीबोट सेवेत काळानुरूप बदल होत आहेत. जुन्या फेरीबोटींना पर्याय म्हणून रो-रो फेरीबोटींचा समावेश सेवेत करण्‍यात येणार आहे. सध्या सेवेत असलेल्या सर्व फेरीबोट सुस्थितीत आहेत. परंतु वातावरण आणि पाण्याच्‍या दाबामुळे फेरीबोटींच्या क्रियाकल्पावर परिणाम होतो व हे जाणून घेणे आवश्यक असल्याचे मत राजेभोसले यांनी व्यक्त केले.

दरवर्षी बंदर कप्तान किंवा त्यांच्या सर्वेक्षकाद्वारे सर्वेक्षण केले जाते. १९८६ मध्ये बांधलेल्या पीएनजी-४७१, पीएनजी-६०६ आणि पीएनजी-६१७ तर १९८८ मध्ये बांधलेली पीएनजी-४६४ या चार फेरीबोटींच्‍या कार्यकाळाला २० वर्षे होऊन गेली आहेत.

तरीही त्यातील तीन तिसवाडी, सांगे, चांदर येथे सेवेत कार्यरत आहेत. त्यानंतर १९९१ ते २०२४ पर्यंत नोंद झालेल्या फेरीबोटी सेवेत असल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. १९९१ ते १९९९ या काळात ९ फेरीबोटींची बांधणी झाली तर २००९ ते २०२४ पर्यंत २० फेरीबोट बांधल्‍या.

लवकरच रो-रो फेरीबोट सेवा सुरू

चोडण-रायबंदर या जलमार्गावर सर्वांत जास्त वाहनांची वर्दळ असते. त्यासाठी या मार्गावर सहा फेरीबोटी चालवाव्या लागतात.

त्यास पर्याय म्हणून नदीपरिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केरळच्या धर्तीवर अंतर्गत जलमार्गांवर रो-रो फेरीबोट चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही सेवा सुरू होईल.

खासगी कंपनीकडून या फेरीबोटींची बांधणी झाली आहे. दोन नव्या रो-रो फेरीबोटी सुरू केल्यानंतर किमान दोन अतिरिक्त फेरीबोटी खात्याकडे असतील. त्यानुसार दोन जुन्या फेरीबोट रद्द केल्या जातील.

भरती-ओहोटीमुळे उद्‌भवतात अनेक समस्या

धावजी येथे नदीचे पात्र खूप अरुंद आहे आणि जर त्या पात्रातून बार्ज जात असेल तर फेरीबोट हलवणे शक्य नाही. जास्त पाण्यात इंजीन जास्त गरम झाल्यामुळे ‘बांदोडा’ ही फेरीबोट कॅप्टनने थांबवून नांगरून ठेवली होती. बार्ज निघून गेल्यानंतर १५ मिनिटांत फेरीबोट सुरू करून ती सेवेत रुजू झाल्याचे राजेभोसले यांनी सांगितले. पावसाळ्यात फेरीबोटींना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. भरतीमुळे फेरीबोटी बंद ठेवाव्या लागतात.

बुडालेली फेरीबोट चार दिवसांत काढणार?

रायबंदर-चोडण जलमार्गावरील ‘बेती‘ ही फेरीबोट चोडण येथील जेटीवर चार दिवसांपूर्वी बुडाली. या फेरीबोटीत अडकलेली दुचाकी वाहने काढण्यात आली. आता भरती आणि ओहोटीचा विचार करून फेरीबोट काढण्याचे काम सुरू आहे. त्यासाठो पोंटूनचा वापर केला जात आहे. आणखी किमान चार दिवस हे काम चालणार आहे. बुडालेल्‍या ‘बेती’ फेरीबोटीची पुन्हा दुरुस्ती आणि नूतनीकरण केले जाणार आहे. तिची दुरुस्ती आणि सर्वेक्षण फेब्रुवारी २०२५ मध्ये करण्यात आले होते. त्या अहवालाचीही पडताळणी केली जाईल. कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले असून, ते सचिवांकडे पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली.

सध्‍या राज्‍यभरात २६ फेरीबोटी कार्यरत

राज्यातील १८ जलमार्गांवर ३० फेरीबोटी चालतात,. परंतु सद्यःस्थितीत रायबंदर-चोडण जलमार्गावर सहापैकी पाच फेरीबोटी कार्यरत आहेत. त्‍यामुळे एकूण फेरीबोटींची संख्या २९ होते.

दोन फेरीबोटी दुरुस्तीसाठी पाठविल्‍या असून एक फेरीबोट चोडण येथे फेरीधक्क्‍यावर पाण्यात अडकली आहे. म्हणजे तीन फेरीबोटी कमी झाल्‍या. परिणामी सध्‍या २६ फेरीबोटीच सेवा देत आहेत, हे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT