New Education Policy Dainik Gomantak
गोवा

Goa Education: नवीन शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून मात्र निकाल 29 एप्रिललाच

New Education Policy Goa: इयत्ता ९चा निकाल मात्र २९ एप्रिल रोजी लागणार आहे

Akshata Chhatre

पणजी: नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यात १ एप्रिलपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. राज्यातील सरकारी, अनुदानित तसेच इतर शैक्षणिक संस्थांना हा नियम लागू असल्याचे परिपत्रक शिक्षण संचालनालयाने जारी केले आहे, तरीही इयत्ता ९चा निकाल मात्र २९ एप्रिल रोजी लागणार आहे. राज्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होणार असले तरीही शाळांना जुन्या शैक्षणिक वर्षाची समाप्ती करावीच लागेल.

इयत्ता सहावी ते दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा नवीन नियम लागू असेल. एप्रिल महिन्यात सकाळी ११.३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी तास घेण्यात येतील. या विद्यार्थ्यांना १ मे ते ३ जून २०२५ या काळात उन्हाळी सुट्टी असेल. ४ जूनपासून नियमित वेळेत शाळांचे तास घेण्यात येणार आहेत. त्यामुळे १ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी संस्था प्रमुखांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यासंदर्भात शाळा व्यवस्थापनांना सूचित केले आहे आणि याबद्दलचे परिपत्रकही शिक्षण खात्याकडून जारी करण्यात आले होते. समोर आलेल्या माहितीनुसार इयत्ता नववीपर्यंतचे निकाल शाळांना २९ एप्रिल पर्यंत जाहीर करावे लागणार असल्याचं शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे म्हणालेत.

नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात निकालांच्या आगोदर जरी झाली तरीही त्यामुळे काहीही समस्या निर्माण होणार नाही, कारण सध्या गोव्यात इयत्ता आठवीपर्यंत पास करण्याचे धोरण लागू केलं गेलंय आणि नववीत नापास झाल्यास पुन्हा परीक्षा देण्याची सवलत दिली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT