Lung Cancer Dainik Gomantak
गोवा

Lung Cancer: गोव्यात फुफ्फुसाच्या कर्करोगाचा वाढता धोका! दरवर्षी 120 ते 150 नवे रुग्ण; महिलांचे प्रमाण 10 वरून थेट 40 टक्क्यांवर

Lung Cancer Cases Increasing in Goa: गोव्यात दरवर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगाचे सुमारे १२० ते १५० नवीन रुग्ण आढळू लागले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यात दरवर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगाचे सुमारे १२० ते १५० नवीन रुग्ण आढळू लागले आहेत. एका दशकापूर्वी या रुग्णांमध्ये ९० टक्के पुरुष आणि १० टक्के महिलांचा समावेश होता. परंतु मागील काही वर्षांत हे प्रमाण ६० टक्के पुरुष आणि ४० टक्के महिला असे झाल्याने ती चिंतेची बाब बनू लागली आहे. त्यामुळे यामागील कारणे शोधण्याची तथा अभ्यास करण्याची मागणी ‘नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर टोबॅको इराडिकेशन (नोट) इंडिया’ या संस्थेने केली असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी दिली.

डॉ. साळकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गोव्यात फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण वाढत असल्याने ही बाब गंभीर आहे. महिलांचे प्रमाण वाढणे हा एक अत्यंत महत्त्वाचा बदल असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. एखादी महिला धूम्रपान करत नसेल, तर याचा अर्थ असा नाही की ती तंबाखूशी संबंधित आजारांपासून सुरक्षित आहे. घरी, कामाच्या ठिकाणी किंवा इतर बंदिस्त जागांवर तंबाखूच्या धुराच्या संपर्कात आल्याने गंभीर परिणाम होऊ शकतात. गोव्यातील महिलांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा वाढता भार ‘पॅसिव्ह स्मोकिंग’ आणि इतर टाळता येण्याजोग्या कारणांशी किती प्रमाणात संबंधित असू शकतो, हे समजून घेणे गरजेचे आहे, असे डॉ. साळकर म्हणतात.

डॉ. साळकर यांच्या मते, या बाबी तपासणे आवश्यक

१) गेल्या दशकात किंवा त्याहून अधिक काळात गोव्यातील महिलांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये झालेला बदल.

२) सक्रिय धूम्रपान करणाऱ्या, पूर्वी धूम्रपान करणाऱ्या आणि कधीही धूम्रपान न करणाऱ्या महिलांचे प्रमाण.

३) घरांमध्ये, कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी होणारा अप्रत्यक्ष धूम्रपानाचा (सेकंड-हँड स्मोक) संपर्क.

४) घरातील आणि बाहेरील वायू प्रदूषण, ज्यामध्ये घरातील इंधनाच्या संपर्काचा समावेश आहे;

५) महिलांमधील फुफ्फुसाच्या कर्करोगाची वैद्यकीय आणि रोगशास्त्रीय वैशिष्ट्ये.

६) धूम्रपान करणाऱ्या आणि कधीही धूम्रपान न करणाऱ्यांमधील धोक्याच्या घटकांमधील संभाव्य फरक.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यासाची गरज

महिलांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग का वाढत आहे? याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास होणे गरजेचे आहे. विशेषतः अशा महिलांच्या बाबतीत ज्यांनी कधीही स्वतः धूम्रपान केलेले नाही. ‘सेकंड-हँड’ तंबाखूचा धूर (दुसऱ्याचा धूर शरीरात जाणे), घरातील वायू प्रदूषण, कामाच्या ठिकाणी होणारा संपर्क, पर्यावरणीय प्रदूषके, बायोमास इंधनाचा (उदा. लाकूड, शेणी) वापर, रेडॉन वायू आणि इतर धोक्याच्या घटकांचा यात काय सहभाग असू शकतो याची तपासणी करणे आवश्यक आहे, असे डॉ. साळकर यांचे म्हणणे आहे.

४४.४ कोटी लोक अप्रत्यक्ष प्रभावित

देशात अप्रत्यक्ष धुम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंतनीय आहे. २०२३ मध्ये देशात सुमारे ४४.४ कोटी लोक अप्रत्यक्ष धुम्रपानामुळे प्रभावित झाले होते. तत्पूर्वीच्या आकडेवारीवर लक्ष टाकल्यास १९९० मध्ये अप्रत्यक्ष धुम्रपानामुळे २.१७ लाख जण मृत्यू पावले. २०२३ मध्ये ही संख्या वाढून ३.२५ लाखावर पोहोचली. त्यात महिलांचा मृत्यू १.१३ लाखांवरून १.५६ वर पोहोचला, तर पुरुषांचे मृत्यूची संख्या १.०४ लाखावरून १.६८ लाखावर पोहोचली होती, असे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Highest Paid PM: वर्षाला 26.9 कोटींचे वेतन, अमेरिकन अध्यक्षांपेक्षा 7 पटीने जास्त, पगारात 64 टक्क्यांची वाढ घसघशीत; सिंगापूरचे PM जगातील सर्वात श्रीमंत नेते

Digital India: डिजिटल इंडियाच्या नव्या पर्वासाठी भारत सज्ज! PM मोदींनी 'जीएफएफ'मध्ये मांडली चतु:सूत्री; फिनटेक उद्योगाला दिल्या महत्त्वाच्या सूचना

Ganesh Idol: गणेशोत्सवाआधी मोठा खुलासा! गोव्यात गणेशमूर्तींत प्लास्टर ऑफ पॅरिसचा उघड वापर; 5 नमुने मर्यादेपेक्षा अधिक

Goa Panchayat: सरपंचांच्या एकहाती 'सील' कारवाईला लगाम! पंचायतींसाठी सरकारची नवी कार्यपद्धती; आता ठरावाशिवाय करता येणार नाही कारवाई

Ujjwala Scheme: 'उज्ज्वला'सह सर्व सरकारी योजना सुरूच राहणार! मुख्यमंत्री सावंतांनी अफवांना लावला पूर्णविराम; गृह आधार, दयानंद योजनेचाही लाभ मिळणार

SCROLL FOR NEXT