Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Viral video of parents making reels on beach: आजकाल सोशल मीडियावरील प्रसिद्धीचे भूत लोकांच्या डोक्यात कशा प्रकारे शिरले आहे, याचे अत्यंत संतापजनक आणि काळीज पिळवटून टाकणारे वास्तव समोर आले.
Viral Beach Video
Viral VideoDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Viral Beach Video: आजकाल सोशल मीडियावरील प्रसिद्धीचे भूत लोकांच्या डोक्यात कशा प्रकारे शिरले आहे, याचे अत्यंत संतापजनक आणि काळीज पिळवटून टाकणारे वास्तव समोर आले. लाईक्स आणि व्ह्यूजच्या नादात लोक आपल्या मुलांच्या सुरक्षेचाही विचार करायला तयार नाहीयेत. सध्या एका बीचवरील असाच एक धक्कादायक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून ज्याला पाहून कोणाचाही संताप अनावर होईल.

दरम्यान, या व्हायरल व्हिडिओमध्ये एक जोडपे समुद्राच्या (Sea) किनाऱ्यावर कॅमेरा ऑन करुन चालत असताना दिसत असून, त्यांच्या अगदी जवळ त्यांची लहान मुलगी देखील चालत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, अचानक आईचा हात सुटल्यामुळे ती चिमुरडी पाण्यात पडते आणि त्याचवेळी समुद्राची एक जोरदार लाट तिला आपल्यासोबत ओढून नेऊ लागते.

Viral Beach Video
Viral Video: ना पेट्रोलचा खर्च, ना ट्रॅफिक जामची चिंता! पठ्ठ्या थेट पॅरामोटरने जातो ऑफिसला; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सर्वात भयंकर बाब म्हणजे, मुलगी पाण्यात बुडण्यापासून वाचण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावून संघर्ष करत होती, परंतु तिच्या आई-वडिलांचे लक्ष केवळ त्यांच्या मोबाईल फोन आणि सुरु असलेल्या कॅमेऱ्यावर होते. त्या महिलेने एकदा मागे वळून पाहिलेसुद्धा, परंतु पुन्हा कॅमेऱ्यासाठी पोझ देणे सुरु ठेवले, तर तिचा नवरा अत्यंत निर्विकारपणे व्हिडिओ शूट करत राहिला. सुदैवाने, तिथे उपस्थित असलेल्या एका मुलाने त्या बुडणाऱ्या मुलीला पकडले. व्हिडिओमध्ये दिसते की, त्या मुलाने क्षणाचाही विलंब न करता या चिमुरडीला वाचवले. जर त्याने तिच्या दिशेने वेळीच धाव घेतली नसती, तर मोठा अनर्थ ओढवला असता.

Viral Beach Video
Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. नेटकरी अशा बेजबादार पालकांचा समाचार घेत आहेत. आजच्या काळात लोक लाईक्स आणि फॉलोअर्सच्या मोहात इतके अंधळे झाले आहेत की त्यांना पोटच्या मुलांचीही पर्वा राहिलेली नाही, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. एका युजरने अतिशय मार्मिक टिप्पणी करत लिहिले की, रील्सचे 'री-टेक' होऊ शकतात, पण मानवी आयुष्याचे कधीही 'री-टेक' होत नाहीत. तर दुसरीकडे, काही लोक हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असल्याचा दावा करत आहेत. आजच्या डिजिटल युगाची हीच एक अत्यंत कडू आणि विदारक सत्यता दर्शवते, जिथे सोशल मीडियाची नशा पालकांच्या जबाबदारीवर आणि समजुतदारपणावर भारी पडत चालली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com