goa water supply  Dainik Gomantak
गोवा

Bardez Water Crisis: 'टँकर'वरती अवलंबून राहण्याची गरज मिटली; उत्तर गोव्याला पाण्याचा तुटवडा भासणार नाही!!

Water Crisis in Goa: उत्तर गोव्यात पाण्याचा तुटवडा भासणार नाही, असे जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी मडगावात एका कार्यक्रमावेळी सांगितले

Akshata Chhatre

बार्देश: गेले आठवडाभर मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जाणारा बार्देश तालुका किमान मंगळवारपर्यंत तहानलेलाच असणार अशी माहिती मिळाली होती. सध्या डिचोलीतील साळ येथे पाण्याच्या बांधाऱ्याचे काम चालू आहे. हा बंधारा मे किंवा जास्तीत जास्त डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होऊन कार्यान्वित होईल. ३०० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या बंधाऱ्यात ३५० एमएलडी जादा पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. त्यामुळे उत्तर गोव्यात पाण्याचा तुटवडा भासणार नाही, असे जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी मडगावात एका कार्यक्रमावेळी सांगितले.

तिळारीच्या कालव्याला १० मीटर लांब आणि तीन मीटर रुंद पडलेले भगदाड बुजविण्यात आले आहे. कालव्याखाली असलेला पाईप खचल्याने हे भगदाड पडले होते. तेथील जुना पाईप काढून त्याखाली कॉंक्रिट घालण्यात आले.

त्यावर पाईप बसविल्यानंतर त्यावर पुन्हा कॉंक्रिट घालण्यात आले आणि त्यांनतर शंभर ट्रक भराव घालण्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम निम्मे पूर्ण झाले आहे आणि शनिवारी (ता.१) दुपारपर्यंत भरावाचे काम पूर्ण केले गेलेय.

जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर यांनी शनिवारी दुपारी मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांच्यासह कुडासेची धनगरवाडी गाठली आणि भगदाड पडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. त्यांनी येथे घालण्यात येणाऱ्या भरावावर कॉंक्रिटही घालण्याची सूचना केली. त्यांनी नंतर तिळारी धरणालाही भेट दिली. तेथे महाराष्ट्राचे जलसंपदा कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. शिरोडकर यांनी अचानकपणे हा दौरा निश्चित केला. सर्वोच्च न्यायालयात म्हादईविषयी सुनावणी होण्याची शक्यता असल्याने मुख्य अभियंता प्रमोद बदामी दिल्लीत होते.

कळंगुटला एक दिवस आड पाणीपुरवठा

पर्वरीतील पाण्याच्या टाक्यांमधून याआधी १० तास पाणीपुरवठा केला जात असे. आता केवळ ५ तास पुरवठा करता येतो. सध्या कमी दाबाच्या आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्यास पर्वरीवासीयांना सामोरे जावे लागते. कळंगुट, हडफडे परिसराला एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बार्देश तालुक्याला पाणीपुरवठा करण्यासाठी अस्नोडा येथे १०० दशलक्ष लीटर्स क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT