Margao Court Canva
गोवा

Margao News: मडगाव नवीन न्यायालय पूर्ण होणार 2026 मध्ये? इमारतीचे बांधकाम संथगतीने सुरू

Margaon New Court Building: सुमारे दहा वर्षांनंतर व अनेक प्रयत्नांनंतर मडगावमधील नवीन न्यायालय इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले व ही इमारत २०२५ पर्यंत पूर्ण होणार असे सांगण्यात आले. मात्र, ज्या संथगतीने इमारतीचे काम सुरू आहे ते पाहता इमारत पूर्ण होण्यास २०२६ साल उजाडेल असे दिसत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: सुमारे दहा वर्षांनंतर व अनेक प्रयत्नांनंतर मडगावमधील नवीन न्यायालय इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले व ही इमारत २०२५ पर्यंत पूर्ण होणार असे सांगण्यात आले. मात्र, ज्या संथगतीने इमारतीचे काम सुरू आहे ते पाहता इमारत पूर्ण होण्यास २०२६ साल उजाडेल असे दिसत आहे.

काही अधिकाऱ्यांच्या मते ही इमारत २०२५ ऐवजी २०२६ च्या पहिल्या तीन चार महिन्यांमध्ये पूर्ण होऊ शकेल. या इमारतीच्या बांधकामाला जवळ जवळ ३२ कोटी रुपये खर्च येणार आहे. सध्या केवळ दुसऱ्याच मजल्यावरील स्लॅबचे काम सुरू आहे.

न्यायालयाच्या नवीन इमारतीला पार्किंगसाठी सुविधा नाही असे कारण पुढे करून त्यास विरोधही केला होता. या इमारत बांधकामाची निविदा तीन वेळा काढण्यात आली व तिन्हीवेळा वाढीव खर्च दाखविण्यात आला होता. २०१९ मध्ये केवळ ९.३ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. जुन्या बाजारातील पोर्तुगीजकालीन इमारतीत दिवाणी आणि सत्र न्यायालय सुरू आहे, मध्यंतरी या इमारतीचे कौलारू छप्पर नादुरुस्त झाले होते. पाणी आत येत होते. त्यामुळे ८० लाख रुपये खर्चून छप्पराची दुरुस्ती करण्यात आली होती.

आता जुन्या बाजारातील दिवाणी आणि सत्र न्यायालयात येणारे वकील तसेच लोकांना पार्किंची सुविधा नसल्याने नाहक त्रास सोसावा लागत आहे. न्यायालयाच्या इमारती मागील रस्त्यावर दोन्ही बाजुने वाहने पार्क केली जातात व वाहतुकीला अडथळा होत असतो.

नवीन जिल्हा व सत्र न्यायालयात जाणाऱ्या वकिलांना व लोकांनाही पार्किंगचा प्रश्न सतावतो. न्यायालयासमोरील एसजीपीडीएच्या मोकळ्या जागेत वाहने पार्क केली जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'युती करणार नाही, इतरांना करू देणार नाही' मनोज परब यांच्या फेसबुक पोस्टची चर्चा; ये तुकाराम को चाहिये क्या?

'...म्हणून गोवा सोडलं', आयोजकांनी पहिल्यांदाच सांगितलं IBW हलवण्याचं कारण; नेमका गोंधळ काय?

रानडुक्कर समजून झाडलेली गोळी मित्राला लागली; सावंतवाडीच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

Opinion: भारताला उंच पुतळ्यांत नव्हे, तर एकेकाळी जगाला आपल्याकडे आदराने व कुतूहलाने पाहायला लावणाऱ्या गूढतेत शोधणे आवश्यक आहे..

Goa Live News: नगरगाव जिल्हा पंचायत निवडणूकीसाठी धुळू धोंडो शेळके यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT