Urrak Season Goa X
गोवा

Urrak Goa: पयली 'हुर्राक' आयली! गोव्याचा प्रसिद्ध ‘जंगल ज्यूस’

Urrak Season Goa: पुढील आठवड्यापर्यंत हुर्राकप्रेमींना नवीन हुर्राकाची चव चाखायला मिळेल असे वाटते. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनाही गेल्या काही वर्षांपासून हुर्राक भुरळ पाडत आहे.

Sameer Panditrao

डिचोली: काजू पिकासाठी आघाडीवर असलेल्या डिचोली तालुक्यात अद्याप या झाडांना पूर्ण बहार आलेला नसला तरी डिचोलीत पहिल्या धारेचे ‘हुर्राक’ तयार झाले आहे. मात्र ते अजून बाजारात उपलब्ध झालेले नाही.

पुढील आठवड्यापर्यंत हुर्राकप्रेमींना नवीन हुर्राकाची चव चाखायला मिळेल असे वाटते. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनाही गेल्या काही वर्षांपासून हुर्राक भुरळ पाडत आहे. डिचोलीत जरी पहिल्या धारेचे हुर्राक उपलब्ध असले तरी ते स्थानिक नव्हे, तर शेजारील दोडामार्ग भागातील काजूच्या बोंडूपासून गाळण्यात आले आहे. तालुक्यात काजू व्यवसाय अजून पूर्ण जोमात सुरू झालेला नाही. तरी देखील शहरासह दोन-तीन ठिकाणी दारूभट्ट्या पेटल्या आहेत. त्यामुळे काजू हंगामाची चाहूल लागली आहे.

पुढील मार्च महिन्याच्या सुरवातीपासून डिचोली भागात काजू पीक बहरात येण्याची शक्यता आहे. काही काजू बागायतदारांकडून तसे संकेतही मिळाले आहेत.

उशिराने फळधारणा झाल्‍याने काजू हंगाम लांबणीवर

डिचोली तालुका हा काजू पिकाबाबतीत आघाडीवर आहे. तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागात काजू पीक हा एक प्रमुख व्यवसाय आहे. काजू हंगामात सर्वत्र काजू बोंडूपासून दारू गाळणीचा व्यवसायही जोमात चालू असतो. मात्र अजून यंदा काजूच्या झाडांना उशिराने फळधारणा झाली. त्यामुळे डिचोलीत अजूनही अपेक्षेप्रमाणे काजू पीक मिळत नाही. यंदा काजू पीक लांबणीवर पडणार असून हवामान अनुकूल राहिल्यास पुढील मार्च महिन्याच्या सुरवातीपासून काजू पिकाला जोर येण्याची शक्यता आहे.

काय आहे हुर्राक?

दारूभट्ट्या पेटवून काजू बोंडूच्या रसापासून हुर्राक गाळण्यात येते. काहीजण त्‍यास ‘जंगल ज्यूस’ असेही संबोधतात. उष्णता वाढून उकाडा असह्य झाला की थंडगार हुर्राकची नशा काही औरच असते, असे अनेकजण सांगतात. मात्र अतिसेवन केल्यास नशा चढते. त्यामुळे हुर्राकचा आस्वादही मर्यादित प्रमाणात घेणे हितकारक ठरते.

वन्‍यप्राण्‍यांची डोकेदुखी

एरवी फेब्रुवारी महिन्‍यापासून डिचोली तसेच सत्तरी तालुक्‍यात काजूच्‍या हंगामाला प्रारंभ होतो. मात्र यंदा अजून तरी सामसूमच आहे. बागायतदार काजू बागायतींत येऊन-जाऊन असतात. कारण वन्‍यप्राण्‍यांमुळे त्‍यांची डोकेदुखी वाढत आहे. त्‍यांनी सरकार दरबारही त्‍यांनी साकडे घातले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT