The new bridge of Borim became damage Dainik Gomantak
गोवा

बोरीच्या नव्या पुलाला गेले तडे...

पृष्ठभाग खचला: रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

बोरी: येथील नव्या पुलाच्या पृष्ठभागावरील रस्त्यावर ठिकठिकाणी डांबरीकरण धुपून जाऊन खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वीचा रस्त्याचे फेर डांबरीकरण करणे गरजेचे आहे, असे पंचायत सदस्य सुनील सावकार यांनी सांगितले.

झुवारी नदीवरील बोरीच्या नव्या पुलाला आता 30 वर्षे पूर्ण होत आहेत. हा पूल बांधतेवेळी आलेल्या खर्चाच्या दुप्पट खर्च हा पुल पुन्हा दुरुस्त करण्यासाठी आला आहे. या पुलावरून प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणावर वाहतूक होत आहे. वास्को बंदरातून येणाऱ्या अवजड मालाची वाहतूक करणारी वाहने इंधन घेऊन जाणारे टॅंकर तसेच वेर्णा, सांजूजे एरीया औद्योगिक वसाहतीतून मालाची ने-आण करणारी वाहने तसेच याच पुलावरून बेळगाव, हुबळी, धारवाड, मुंबई, सांगली-कोल्हापूर भागात जाणारी प्रवासी वाहने ये जा करतात.

पुलाची स्थिती गंभीर

दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणाऱ्या बोरी पूल हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या ठिकाणी नव्या पुलाची अत्यंत निकडीची गरज आहे. यदाकदाचित या पुलाला धोका पोचल्यास मोठा अनर्थ होणार. शिवाय लोकांचीही वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने वेळकाढू धोरण न अवलंबिता वेळीच या पुलाचे बांधकाम हाती घ्यावे, अशी मागणी पंच सदस्य सुनील सानकार देवारी यांनी केली आहे.

संभाव्य धोका टाळा!

पुलाची स्थिती अत्यंत गंभीर बनलेली आहे. पुलाच्या पृष्ठभागावरील रस्त्याला मोठे तडे गेले आहेत. पावसाळ्यात या तड्यातून पाणी आत घुसून आतील लोखंडी सापळा गंजून निकामी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पुलावरून नित्य दिवस-रात्र होणारी प्रवासी वाहनांची वर्दळ आणि मालवाहू वाहनांची वर्दळ पाहताच पुलाला धोका पोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वेळीच सरकारने दखल घेऊन संभाव्य धोका टाळावा, अशी लोकांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

SCROLL FOR NEXT