New Borim Bridge Hearing
सासष्टी: नवीन बोरी पूल जमीन संपादनसंदर्भातील प्रकरण राष्ट्रीय हरित लवादाकडे आहे. याप्रकरणी सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी निश्र्चित करण्यात आली होती. मात्र, आता ती सुनावणी २३ एप्रिलपर्यंत लवादाने पुढे ढकलली आहे.
त्यामुळे लोटली व बोरी येथील शेतकऱ्यांना धक्काच बसला आहे व पुढील कृतीसाठी सर्व शेतकरी एकत्र येऊन बैठक घेणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
ही सुनावणी पुढे ढकलल्याने, तोपर्यंत सार्वजनिक बांधकाम खाते लवादाकडे हे प्रकरण असतानाही जमीन संपादन व बांधकाम प्रक्रिया सुरू करणार असल्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांत भरपूर काम असल्याने प्रकरण सुनावणीस येण्यापूर्वीच पुढील सुनावणीची तारीख जाहीर करण्यात आली.
शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलाने सुनावणी लांबवू नये, असे सांगितले असतानाही चेन्नईहून तज्ज्ञ गैरहजर असल्याचे कारण देऊन सुनावणी पुढे ढकलण्यात आली. मात्र, सोमवारपर्यंत आक्षेप व मागण्या नोंद कराव्यात, अशी सूचना यावेळी देण्यात आली.
सर्व शेतकऱ्यांना एकत्र आणून पुढील कृती ठरविण्यासाठी लवकरच बैठक बोलावली जाईल, असे समाजकार्यकर्ते अभिजीत प्रभुदेसाई यांनी सांगितले. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात नेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने जमीन संपादन किंवा बांधकामाला स्थगिती न दिल्याने ही प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम खाते पुढे नेईल, अशी भीती प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.