Khazan Land  
गोवा

New Borim Bridge: आमच्या उदरनिर्वाहाचे साधन नष्ट करु नका; बोरी पुल बांधकामाबाबत शेतकऱ्यांची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: नवीन बोरी पुलाच्या बांधकामाला सध्या अनेक अडचणी येत आहेत व त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून वाढता विरोध होत आहे. शनिवारी सकाळी मडगावच्या रवींद्र भवनमध्ये केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला, पण तो ऑनलाईन असल्याने शेतकऱ्यांना त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळाली नाही.

काही शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषिमंत्री व मुख्यमंत्री या दोघांना देण्यासाठी निवेदने आणली होती. मात्र, ती देता आली नाहीत. त्यात केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांना देण्यासाठी आणलेल्या निवेदनात बोरी पुलाच्या बांधकामापासून शेत व खाजन जमिनीचे रक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हे निवेदन कारबोट, माकाझन, बेबदो कूळ असोसिएशनचे अध्यक्ष आल्बर्ट पिन्हेरो यांनी सही केलेले असून हे निवदेन देण्यासाठी ९६ वर्षीय शेतकरी दुमिंग कॉस्ता हेसुद्धा आले होते.

केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या संवाद कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आल्बर्ट पिन्हेरो यांनी सांगितले, की केंद्रीय कृषिमंत्र्यांनी खाजन जमिनीचे रक्षण केले जाईल असे सांगितले त्याचे आम्ही स्वागत करतो. जर केंद्र व राज्य सरकार खरोखरच गंभीर असेल, तर खाजन जमिनीच्या रक्षणासाठी आमचासुद्धा पाठिंबा असेल.

...तर उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होईल

पिन्हेरो यांनी पत्रकारांना केंद्रीय कृषिमंत्र्यांना देण्यासाठी तयार केलेले निवेदन दाखविले, त्यात त्यांनी बोरी पूल बांधताना लोटली गावातील खाजन जमिनीला बाधा होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. जर खाजन जमिनीत पूल बांधला तर स्थानिकांच्या उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होईल असेही निवदेनात स्पष्ट करण्यात आले आहे. खाजन शेताचा उपयोग पर्यावरण व जैवविविधता सांभाळण्यासाठी होत असतो, असेही त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

खास धोरण तयार कण्याची गरज

लोटली गावातील खाजन जमिनीचे शेतकऱ्यांनी शेकडो वर्षांपासून जतन केले आहे. मात्र नवीन बोरी पुलाच्या बांधकामामुळे ही खाजन जमीन नष्ट होण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. सरकारने ज्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत त्यांचे आम्ही स्वागतच करतो. मात्र, सरकारने शेत व खाजन जमिनीच्या रक्षणासाठी खास धोरण तयार करणे आवश्यक असल्याचे पिन्हेरो यांनी निवेदनात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Xavier's Exposition: पोप फ्रान्सिस यांना निमंत्रित करण्यात भाजपचे डबल इंजिन सरकार अपयशी !!

'World Pharmacist Day' निमित्य औषधविक्रेत्यांचे आरोग्य प्रणालीतील स्थान, कोविड काळातील सेवा, लसीकरणातली भूमिका याबद्दल जाणून घ्या..

Vegetable Rates: मुसळधार पावसाचा फटका; गोव्यात भाज्यांचे दर वाढले

Ponda Crime: ..'संशय' आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा! वाढत्या चोऱ्या आणि गुन्ह्यांवरून नागरिकांना 'सतर्क' राहण्याचे आवाहन

Bicholim News: रंब्लर्समुळे वाढली डोकेदुखी! 'डिचोली-साखळी' रस्त्यावर वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

SCROLL FOR NEXT