Agriculture Gomantak Digital Team
गोवा

Goa Agriculture News : कृषी संचालनालय शेतकऱ्यांसाठी सज्ज

नेव्हिल आफोन्सो : 40 हेक्टर क्षेत्रफळात नाचणी लागवडीचा उद्देश

गोमन्तक डिजिटल टीम

येत्या आठवड्याभरात मॉन्सून गोव्यात दाखल होणार असून पावसाळी पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून जमीन मशागतीच्या कामांना वेग आला आहे. भातशेती, भाजीपाला, कणगी व इतर प्रकारच्या शेतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. कृषी संचालनालयदेखील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सज्ज झाले आहे.

शेतीसाठी लागणारी अवजारे, यंत्रे, ट्रॅक्टर आदी शेतकऱ्यांना पुरविले जात आहे. त्यासोबतच भात बियाणे, भाजी बियाणेदेखील पन्नास टक्के सवलतीच्या दरात तालुकास्तरीय कृषी सोसायट्यांमध्ये उपलब्ध असल्याचे कृषी संचालक नेव्हिल आफोन्सो यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले. राज्यात सद्यस्थितीत 20 हेक्टर क्षेत्रफळात नाचणीचे उत्पादन लागवडीखाली येते.

यंदा नाचणी लागवडीचे क्षेत्रफळ दुप्पट करण्याचा संचालनालयाचा मानस असून यावर्षी सुमारे 40 हेक्टर क्षेत्रफळात नाचणी लागवडीचा उद्देश ठेवण्यात आला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. राज्यातील सुमारे 300 ते 400 शेतकरी यंदा पहिल्यांदा नाचणी लागवड करणार आहेत. नाचणी पीक प्रामुख्याने सत्तरी, काणकोण, पेडणे, केपे, सांगे, डिचोली आदी भागात लागवडीवर भर देण्यात येत असल्याचे आल्फोन्सो यांनी सांगितले.

वायंगणातही नाचणी पीक!

वायंगणात पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते, त्यामुळे भातशेतीव्यतरिक्त इतर कोणतेही उत्पादन तेथे घेता येत नाही. परंतु उन्हाळ्यात आपण वायंगणात नाचणीचे उत्पादन घेऊ शकतो. अशा प्रकारचा प्रयोग कृषी संचालनालयाद्वारे केला असून उन्हाळ्यात वायंगणात नाचणी पीक घेता येऊ शकते, असे आफोन्सो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT