Netravali Wildlife Sanctuary 
गोवा

Netravli Poaching Case: कदंबच्‍या ‘त्‍या’ कर्मचाऱ्यांना महामंडळाचाच छुपा पाठिंबा!

Netravli Poaching Case: शिकार प्रकरण : कारवाईस विलंब; वन खाते गंभीर

गोमन्तक डिजिटल टीम

नेत्रावळी अभयारण्यातील साळजिणी येथील जंगलात शिकारीसाठी गेल्याच्या संशयावरून गुन्हा नोंदविण्यात आलेल्या १६ कदंब कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

या नोटिशीला कर्मचाऱ्यांनी उत्तरे देऊन आठवडा लोटला तरी कारवाईबाबत अजून निर्णय झालेला नाही. वन खात्याने गुन्हा नोंदवून सखोल चौकशी चालवली असताना महामंडळ मात्र या प्रकरणाबाबत अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

या १६ कदंब कर्मचाऱ्यांना अटक केल्‍यानंतर त्वरित जामीन मिळाल्याने कदंब वाहतूक महामंडळाने या गुन्ह्याकडे गंभीरतेने पाहिले नव्हते. त्यांना कोणताही जाब न विचारता सेवेत लगेच रुजू करून घेतले होते. वन खात्याने गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केल्यानंतर काही धक्कादायक माहिती पुढे आली होती. ते सहलीसाठी नव्हे तर शिकारीसाठीच गेल्याचे घटनास्थळी सापडलेल्या हत्यारांवरून प्रथमदर्शनी स्‍पष्‍ट झाले होते.

हे प्रकरण वन खात्याने गांभीर्याने घेतल्याने या घटनेच्या दोन आठवड्यांनंतर महामंडळाने आपल्‍या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले होते. सर्वांनी त्यास उत्तर दिले आहे. मात्र, पुढील कारवाईसाठी पावले उचलण्यास महामंडळ संचालकांची बैठकच आयोजित करण्यास विलंब होत आहे.

लवकरच योग्‍य निर्णय : डेरिक नेटो

या १६ कदंब कर्मचाऱ्यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे दोन आठवड्यांपूर्वी कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी सांगितले होते. व्यवस्थापकीय संचालक गोव्याबाहेर आहेत.

ते परतल्यावर लगेच बैठक घेऊन निर्णय घेऊ, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले होते. परंतु ते गोव्यात येऊन आठवडा उलटला तरी अजूनही या प्रकरणावर चर्चा झालेली नाही. यासंदर्भात व्यवस्थापकीय संचालक डेरिक नेटो यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यास दुजोरा दिला. लवकरच संचालकांच्या बैठकीत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WI vs PAK: 18 धावांत 6 विकेट्स...! पाकिस्तानच्या फलंदाजांचा वेस्ट इंडिजच्या 'या' पठ्ठ्यानं उडवला फज्जा; डेल स्टेनचा मोडला 13 वर्ष जुना रेकॉर्ड

Rahul Gandhi: 'मृत' मतदारांसोबत राहुल गांधींची 'चाय पे चर्चा'! निवडणूक आयोगावर पुन्हा साधला निशाणा; VIDEO

Aahana Kumra: 'पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली, गोव्यात मला अटक झाली असती'; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला अनुभव

Pune Crime: रंगकाम करताना घरमालकाला लावला चुना; पुण्यात 4 लाखांची चोरी करणाऱ्या प्रमोदला गोव्यात अटक

Horoscope: गुरुवारी 'गजलक्ष्मी योग'चा शुभ संयोग! 'या' 5 राशींच्या लोकांसाठी उद्याचा दिवस खूप खास, होणार मोठा धनलाभ; भगवान विष्णूचीही राहणार कृपा

SCROLL FOR NEXT