Camera Trap Theft Dainik Gomantak
गोवा

Camera Trap Theft: वाघांच्या गणनेसाठी लावलेले कॅमेरा ट्रॅप चोरीला; नेत्रावळीच्या जंगलात 64 हजारांचा ऐवज गायब

Netravali Tiger Census Camera Theft: वन विभागाने अखिल भारतीय व्याघ्र गणनेच्या कामासाठी या परिसरात कॅमेरा ट्रॅप बसविले होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: नेत्रावळी वन्यजीव अभयारण्याच्या वेर्ले गावातील वन क्षेत्रात वन विभागाने वाघांच्या गणनेसाठी लावलेले दोन कॅमेरा टॅप तसेच या कॅमेऱ्यासंबंधित इतर सामग्री मिळून अंदाजे ६३,९६० रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला. या चोरीमध्ये दोन कॅमेरे, दोन ३२ जीबी एसडी मेमरी कार्ड व १६ एए ड्युरासेल बॅटऱ्या चोरीस गेल्यात.

वन विभागाच्या नेत्रावळी वन्यजीव अभयारण्याचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर देविदास वेळीप यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.५० वा.च्या सुमारास वेर्ले गावातील नेत्रावळी वन्यजीव अभयारण्याच्या वन क्षेत्रात ही चोरी झाली. वन विभागाने अखिल भारतीय व्याघ्र गणनेच्या कामासाठी या परिसरात कॅमेरा ट्रॅप बसविले होते.

वन विभागाचे वनरक्षक आणि वन्यजीव ट्रेकर्स नियमित तपासणीसाठी परिसरात गेले असता वरील वस्तू चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या चोरीमुळे वन विभागाच्या व्याघ्र गणना आणि वन्यजीव निरीक्षणाच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सांगे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक पी. केणी करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Investment Fraud: गोव्यात व्यवसायातील भागीदारीचे आमिष, भोपाळच्या कंत्राटदाराला 3.47 कोटींचा गंडा; श्रीनिवास नायकसह चौघांवर गुन्हा

Goa Film City: गोव्यात फिल्मसिटी उभारणार; जगभरातील चित्रपट निर्मात्यांना मुख्यमंत्र्यांचे चित्रीकरणासाठी आवाहन

Sandpapergate Scandal: 'उस्मान ख्वाजा सर्वात मोठा गद्दार', सँडपेपरगेट प्रकरणावरुन डिव्हिलियर्सचा संताप; क्रिकेटची बदनामी केल्याचा आरोप

Goa Spice Cultivation: जायफळ, वेलची, काळी मिरीला बाजारात मागणी; गोव्यात मसाला पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Accident News: दोन महिन्यांपूर्वी घेतली कार, 100च्या स्पीडमध्ये 20 फूट हवेत उडून झाडावर आदळली… भीषण अपघातात 7 तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT