Goa Investment Fraud: गोव्यात व्यवसायातील भागीदारीचे आमिष, भोपाळच्या कंत्राटदाराला 3.47 कोटींचा गंडा; श्रीनिवास नायकसह चौघांवर गुन्हा

Casino Hotel Partnership Fraud: अतिरिक्त मुख्य न्यायिक मजिस्ट्रेट विजय कुमार पाठक (भोपाळ) यांच्या ४ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार निशातपुरा पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Casino Hotel Partnership Fraud
Goa Investment FraudDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोव्यातील हॉटेल, रिसॉर्ट आणि कॅसिनो व्यवसायात भागिदारी व गुंतवणुकीचे आमिष दाखवून भोपाळ येथील कंत्राटदाराची ३ कोटी ४७ लाख १८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी निशातपुरा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३१६(२) (विश्वासघात) आणि कलम ३१८(४) (फसवणूक) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, भोपाळ येथील न्यायालयाच्या आदेशानंतर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी निओ मॅजेस्टिक कॅसिनोचे व्यवस्थापक संचालक श्रीनिवास पांडुरंग नायक, मंग्युल मायकल, बलदेव अरोरा आणि अमित धवन या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Casino Hotel Partnership Fraud
Goa Film City: गोव्यात फिल्मसिटी उभारणार; जगभरातील चित्रपट निर्मात्यांना मुख्यमंत्र्यांचे चित्रीकरणासाठी आवाहन

अतिरिक्त मुख्य न्यायिक मजिस्ट्रेट विजय कुमार पाठक (भोपाळ) यांच्या ४ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार निशातपुरा पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी भानुपूर, भोपाळ येथील रहिवासी आणि कंत्राटदार सचिन शर्मा यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, २०१४ मध्ये गोवा भेटीदरम्यान त्यांची संशयित मंग्युल मायकल (बेती-गोवा) याच्याशी ओळख झाली आणि पुढे दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री झाली. जून २०२३ मध्ये मायकलने रेस्टॉरंट आणि कॅसिनो व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा व भागीदारी मिळेल, असे आमिष दाखवून तक्रारदाराची अमित धवन याच्याशी ओळख करून दिली.

अमित धवन याने ‘गोल्डन पीस हॉटेल अँड रिसॉर्ट प्रा.लि.’ आणि ‘गोल्डन पीस इन्फ्रास्ट्रक्चर अँड हॉटेल रिसॉर्ट प्रा.लि.’ या गोव्यातील कंपन्यांचे संचालक श्रीनिवास पांडुरंग नायक आणि बलदेव अरोरा यांच्याशी तक्रारदाराची भेट घडवून आणली. व्यवसायात भागीदारी देण्याचा विश्वास देत संशयितांनी तक्रारदाराकडून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम स्वीकारल्याचे आरोप तक्रारीत नमूद आहे. तक्रारदाराने जून ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत बँक खात्याद्वारे एकूण २ कोटी १८ लाख ६ हजार रुपये हस्तांतरित केले.

यामध्ये एचडीएफसी बँक खात्यातून ‘गोल्डन पीस हॉटेल अँड रिसॉर्ट प्रा.लि.’च्या खात्यात १ कोटी ७२ लाख ४० हजार रुपये, स्वाइप मशीनद्वारे ४२ लाख ४६ हजार रुपये आणि अ‍ॅक्सिस बँक खात्यातून ३ लाख २० हजार रुपये जमा करण्यात आले. याशिवाय, अमित धवन याच्या सांगण्यावरून विविध शहरांमध्ये रोख स्वरूपात एकूण १ कोटी २९ लाख १२ हजार रुपये देण्यात आले, ज्यात नागपूर येथे ७ लाख ५० हजार, गुडगाव येथे ४० लाख, दिल्ली येथे ५० लाख, कोलकता येथे ११ लाख ६२ हजार आणि भोपाळमधील करोंद येथे २० लाख रुपयांचा समावेश आहे. अशाप्रकारे बँक व रोख मिळून फिर्यादीकडून एकूण ३ कोटी ४७ लाख १८ हजार रुपये घेण्यात आले.

Casino Hotel Partnership Fraud
Goa Clash: धावस्करवाडा-कारापूर येथे दोन गटात राडा, आठ दुचाकींची मोडतोड आणि आठजण जखमी; परिसरात खळबळ VIDEO

‘जीएसटी’ पावतीही दिली नाही!

संशयितांनी २१ जुलै २०२३ रोजी तक्रारदाराला २५ लाख ५० हजार रुपये परत केले. तसेच, संशयितांच्या सांगण्यावरून पर्वरी येथील ‘मॅजेस्टिक कॅसिनो अँड हॉटेल’मध्ये १ कोटी २९ लाख रुपये कॅसिनोत गमावले असून, याबाबत कोणतीही ‘जीएसटी’ पावती देण्यात आली नाही, असे तक्रारदाराने नमूद केले आहे. या सर्व व्यवहारांनंतर तक्रारदाराची १ कोटी ९२ लाख ५६ हजार रुपये इतकी रक्कम थकीत राहिली असून, ती परत करण्यास संशयित टाळाटाळ करत आहेत आणि व्यवसायातही भागीदारी दिलेली नाही, असे तक्रारीत नमूद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.