पर्वरी (२० डिसेंबर): पंडित जवाहरलाल नेहरु व त्यांचे मंत्रिमंडळातील मंत्री डाव्या विचारसरणीचे होते. असे लोक भारताचा विचार कसा करणार होते? तसेच, देशाला 'बिना खडग् बिना ढाल' किंवा सत्याग्रहामुळे स्वातंत्र्य मिळाले नाही तर सशस्त्र लढ्यामुळे इंग्रजांनी भारताची भूमी सोडली, असे वक्तव्य बिहारचे राज्यपाल मूळचे गोमंतकीय राजेंद्र आर्लेकर यांनी केले.
ईशान्य भारतातील स्वातंत्र्य लढ्यावर आधारीत आनंदिता सिंह यांनी लिहलेल्या A Brief History Of Freedom Struggle In Narth East Of India (1498 - 1947) या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पर्वरीत पार पडला. यावेळी आर्लेकर बोलत होते.
'नरेटीव्ह सेट करताना आमच्या इतिहासकारांच्या डोक्यात देखील डावे विचार होते. आमचे दुर्दैव असे आहे की, १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या मंत्रिमंडळातील मंत्री देखील डाव्या विचारसरणीचे होते. असे लोक आपल्या देशाबद्दल कसा विचार करु शकतील? कारण त्यांचा विश्वास तर बाहेर होता', असे बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर म्हणाले.
'गोवा इन्क्विझिशनचा इतिहास समोर आणायचा प्रयत्न केला तर गोव्यातील काही लोकांना त्रास होतो. परंतु कुणालाही न घाबरता खरा इतिहास समोर आणणे गरजेचे आहे', असे आर्लेकरांनी नमूद केले.
'आमचे स्वातंत्र्य "बिना खडग् बिना ढाल" किंवा सत्याग्रहामुळे इंग्रज भारतातून गेले नाही. जेव्हा आम्ही शस्त्र उचलले तेव्हा इंग्रज घाबरून पळाले. इंग्रजांना लक्षात आले की यांच्या हातात देखील शस्त्र आहेत आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी ते कोणत्याही पातळीपर्यंत जाऊ शकतात', तेव्हा इंग्रज भारतातून गेल्याचे आर्लेकर म्हणाले.
'गुवाहाटीवरून येऊन त्यांचा खरा इतिहास इथे सांगतात तर गोमंतकीय गोव्याचा खरा इतिहास सांगण्यासाठी पुढे का येत नाहीत? दुर्दैवाची गोष्ट आहे की गोव्यातील एकाही व्यक्तीने गोव्याचा खरा इतिहास लिहिला नाहीये. जेवढे लिहिलंय ते बाहेरच्या लेखकांनी लिहिले आहे. गोव्याचा इतिहास लिहण्यासाठी गोमंतकीयांनी पुढाकार घ्यावा', असे आर्लेकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.