
पणजी: 'हर घर जल'मध्ये मिळवलेला खोटा 'फर्स्ट रँक' मिळवलेले भाजप सरकार भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण प्रक्रिया पूर्ण करण्याची घिसाडघाई करत आहे, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी शुक्रवारी (२० डिसेंबर) केला.
भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित बैठकीनंतर काँग्रेस नेते युरी आलेमाव पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील अनेक घरांना नळाचे पाणी मिळत नाही, असे असूनही देशातील पहिले 'हर घर जल' राज्य होण्याचा अनोखा मान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मिळविला. आता हे सरकार भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणात आणखी एक 'प्रमाणपत्र' मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, तेही स्वयंसेवी संस्था आणि इतर घटकांना विश्वासात न घेता,' असे आलेमाव म्हणाले.
भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण बाबत भाजप सरकार गंभीर नाही आणि निधीचा वापर करण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप आलेमाव यांनी केला.
' निर्बिजीकरण कार्यक्रम राबविण्याबाबत पशुसंवर्धन खात्याचा ढिसाळ दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येतो. त्यांना मिळालेल्या निधीचा वापर करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. तीन कोटींपैकी जेमतेम ५८ लाखांचा वापर झाला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुरेसे कर्मचारी आणि योजना नाहीत, असे आलेमाव म्हणाले.
श्वान पकडणाऱ्यांना ५० रुपये मानधन देणे ही या कार्यक्रमाची खिल्ली उडविणारी आहे, असेही आलेमाव म्हणाले.
'लोक ५० रुपयांत कुत्रे पकडतील असं तुम्हाला वाटतं का? सरकार कार्यक्रमांवर कोट्यवधी रुपये खर्च करते, पण आवश्यक तिथे आकर्षक मानधन देण्यात अपयशी ठरते. दोन्ही जिल्ह्यात दोन मुख्य केंद्रांबरोबरच सर्व मतदारसंघात काही सुविधा असायला हव्यात, ज्यामुळे या कामावर लक्ष ठेवता येईल. स्वराज्य संस्थेकडे या कामासाठी पुरेसे कर्मचारी नसतील. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी,' असे आलेमाव म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.