Vittalapur Karapur Bench Area Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Market : साखळीत बाकड्यांना झुडपांचा वेढा, परिसराची स्वच्छता करण्याची स्थानिकांची मागणी

Vithalapur Karapur Nglected Bench Area : विठ्ठलापूर-कारापूर ते साखळी बाजारादरम्यानच्या पुलालगत लोकांना बसण्यासाठी उपलब्ध केलेल्या बाकड्यांना झाडाझुडपांचा वेढा पडला असून या परिसराला अवकळा प्राप्त झाली आहे.

Sameer Panditrao

साखळी : विठ्ठलापूर-कारापूर ते साखळी बाजारादरम्यानच्या पुलालगत लोकांना बसण्यासाठी उपलब्ध केलेल्या बाकड्यांना झाडाझुडपांचा वेढा पडला असून या परिसराला अवकळा प्राप्त झाली आहे. पुलाच्या पदपथावरही अनावश्यक झाडे वाढल्याने येथून चालत जाणे कठीण होत आहे. परिणामी लोकांना पुलावरूनच चालत जावे लागते.

या परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पूर्वी हा प्रसिद्ध ‘लाकडी पूल’ केवळ चालण्यासाठी वापरला जायचा; परंतु मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या संकल्पनेतून या पदपुलाला पक्क्या पुलाचे स्वरूप प्राप्त झाले.

या पुलाची निर्मिती केल्यानंतर विठ्ठलापूरच्या बाजूने प्रशस्त जागा उपलब्ध झाली. या जागेचा वापर या भागातील लोकांना विरंगुळ्यासाठी व्हावा, यासाठी बाकडे बसवून सुशोभीकरण केले होते.

या स्थळाचा विठ्ठलापूर तसेच साखळी बाजारातील लोक वापर करत होते. संध्याकाळच्या सत्रात या ठिकाणी लोक बाकड्यांवर बसून गप्पागोष्टी करायचे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या जागेचा विरंगुळ्यासाठी वापर होत होता. आता या संपूर्ण परिसरात झाडा-झुडपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

जीव मुठीत घेऊन चालतात नागरिक

या पुलावर पादचारी, विद्यार्थी यांना चालत जाण्यासाठी असलेल्या पदपथावरही झुडपांचे अतिक्रमण झाले आहे. या पुलावर वाहनांची मोठी रहदारी असते. त्यामुळे या पुलावरून लोकांना चालणे धोकादायक बनले आहे.

विठ्ठलापूर भागातील बरेच विद्यार्थी साखळीत याच पुलावरून प्रवास करतात. रस्त्यावरून जाताना लोकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन चालावे लागते. या पदपथाचीही स्वच्छता करावी, अशी मागणी महेश सावंत यांनी केली आहे.

पावसाळ्यात या भागात अनावश्यक झाडे-झुडपे वाढली होती. पावसाळा संपल्यावर म्हणजे दिवाळीनंतर या भागाची स्वच्छता करून तो लोकांसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक होते; परंतु अद्याप या परिसराकडे कोणाचेही लक्ष गेलेले नाही.

परिसरात उभे राहणेही असुरक्षित

एका बाजूने तर झाडा-झुडपांखाली झाकलेले बाकडे दिसतच नाहीत. अशा स्थितीत या बाकड्यांवर बसणे किंवा या परिसरात उभेही राहणे असुरक्षित बनले आहे. या परिसराची सार्वजनिक बांधकाम खाते किंवा पंचायतीने स्वच्छता करावी, अशी मागणी काजीवाडा-विठ्ठलापूर येथील महेश सावंत यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'तुमच्यासाठी पार्सल आहे' म्हणून बाहेर बोलावले, साखळी हिसकावून पळाला; गुजरातच्या कुख्यात चोरट्याला अटक

Verna Accident: मद्यपी चालकाचा ताबा सुटला, दुचाकीवरून दोघे फेकले गेले; वेर्णा येथील अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Chandra Grahan: 2025 मधलं भारतातलं पहिलं आणि अंतिम चंद्रग्रहण; कधी आणि कुठे दिसेल जाणून घ्या..

Green Cess Goa: धक्कादायक! 178 कोटींचा हरित कर थकीत; जिंदाल, झुआरी, अदानी, वेदान्‍तासह 26 कंपन्‍या थकबाकीदार

Rashi Bhavishya 28 July 2025: खर्च नियंत्रीत ठेवा, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी ठेवा; कुटुंबात आनंदाचे क्षण येतील

SCROLL FOR NEXT