Goa CM Pramod Sawant On NEET Exam Dainik Gomantak
गोवा

NEET Exam: गोव्यात 12 केंद्रांवर 'नीट'साठी कडक देखरेख; सर्व यंत्रणा सज्ज, मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची माहिती

NEET Exam Goa 12 centres: नीट परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी गोवा सरकारने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली असून राज्यातील १२ परीक्षा केंद्रांवर विशेष देखरेख ठेवण्यात आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी गोवा सरकारने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली असून राज्यातील १२ परीक्षा केंद्रांवर विशेष देखरेख ठेवण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर आवश्यक सुरक्षा, प्रशासकीय नियंत्रण आणि निरीक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, १२ केंद्रांवर होणाऱ्या नीट परीक्षेसंदर्भात प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. परीक्षेच्या व्यवस्थापनाबाबत मुख्य सचिवांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका घेतल्या असून परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. केंद्रांवरील व्यवस्था, वाहतूक, सुरक्षा, उमेदवारांना होणारी गैरसोय टाळणे तसेच परीक्षा प्रक्रियेची गोपनीयता राखणे यावर विशेष भर देण्यात आला आहे.

उमेदवारांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले असून पोलिस प्रशासन, शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वय ठेवण्यात आला आहे.

व्यवस्थेचे निरीक्षण!

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. केंद्रनिहाय व्यवस्थेचे निरीक्षण करण्यात येत असून संपूर्ण प्रक्रिया कठोर देखरेखीखाली पार पाडली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी कोणतीही चिंता न करता परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT