Goa Sattari vanrai Dainik Gomantak
गोवा

Sattari News: सत्तरीतील जंगलांतील देवराईंवर संकट; वाढते मानवी अतिक्रमण

Sattari Forest Devrai: जंगलतोडीमुळे संकट; संवर्धनासाठी सरकारकडून कृती गरजेची;

गोमन्तक डिजिटल टीम

संस्कृतीचा वारसा सांगणारी सत्तरीतील नैसर्गिक जंगले उद्‌ध्वस्त करून मोठ-मोठ्या काँक्रिटच्या इमारती बांधल्या जात आहेत. यामुळे जंगलांतील देवराईंवर संकट आले आहे.

हजारो वर्षांपूर्वी निसर्गाचे महत्त्व माहीत होते म्हणूनच पूर्वजांनी निसर्गातील प्रत्येक घटकात देव पाहिला होता. त्यांनी झरे, कोंडी, नदीनाल्यांबरोबर वृक्ष, वेली, दगड-धोंड्यांना देवत्व बहाल केले होते व त्यातूनच ‘देवराई’ ही संकल्पना उदयास आणली होती.

सत्तरी तालुक्याला चारही बाजूंनी हिरव्यागार डोंगरांनी वेढा घातलेला असून पावसाळ्यात सत्तरीतील उंच डोंगर भाग अगदी खुलून दिसतो. त्यामुळे साहजिकच मानवाची पावले अशा निसर्गाचा आनंद घेण्यास, त्याला जवळून पाहण्यास तिकडे वळतात.

सत्तरीला म्हादई अभयारण्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त असून जंगलात आजही पट्टेरी वाघ, बिबटे, अस्वल, मोर अशा विविध घटकांचे सान्निध्य लाभलेले आहे. विविध जातीच्या भल्यामोठ्या वृक्षांसोबत स्वतःची पिळदार ताकद सिद्ध करणाऱ्या अजस्त्र वेली नष्ट होताना दिसत आहेत.

असंख्य जीवजंतूंना वरदान ठरलेली आणि जंगलाने समृद्ध असलेली सत्तरी तालुक्यातील नागवे येथील देवाची राय अशाच एका प्रकाराची शिकार होताना दिसत आहे. हे पाहून मन खिन्न होऊन जाते. याच देवराईत काही महिन्यांपूर्वी महापाषाण युगातील स्मशानभूमी असल्याचे उघडकीस आले आहे.

‘देवराई’ आणि ‘देवापान्न’

‘देवराई’ म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर देवाच्या नावाने राखून ठेवलेले जंगल व मूर्ती. उत्तर गोव्यात ‘देवराई’ आणि दक्षिण गोव्यात ‘देवापान्न’ नावाने या जंगलाची ओळख आहे. परंतु आमच्या पूर्वजांनी दिलेला वारसा मात्र आम्ही मातीमोल करत चाललेलो आहोत. अनेक ठिकाणी कॉंक्रिटची जंगले उभी राहिल्याचे पाहावयास मिळते आहे.

नागवे गावात जी देवराई आहे, ती मोठ्या प्रमाणात आज मानवी अतिक्रमणांच्या व जंगलतोडीच्या संकटात सापडलेली आहे. ही देवराई पुरातत्वीय सांस्कृतिक व जैविक संपदेचा वारसा दर्शविणारी संचित आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करून लोकवस्तीसाठी नवनवीन बांधकामे केली आहेत. या बांधकामांमुळे ही देवराई आपले अस्तित्व हरवू लागली आहे.
राजेंद्र केरकर, पर्यावरण अभ्यासक
दहा वर्षांपूर्वी फेरफटका मारताना बघितलेली देवराई तीन वर्षांपूर्वी काँक्रिटच्या जंगलात समाविष्ट होताना दिसत होती. मानवी हस्तक्षेप मात्र तिच्या मुळावरच उठणार आहे, हे मात्र त्यावेळी ध्यानी, मनीदेखील आले नाही. पण आज अशा ‘देवराई’ मानवामुळे संकटात आल्या आहेत. सरकारने याविषयी कठोर कार्यवाही करावी.
विठ्ठल शेळके, सत्तरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT