Colva beach dainik gomantak
गोवा

'कोलवा समुद्रकिनाऱ्यावर सुव्यवस्था राखणे गरजेचे'

किनाऱ्यांवरील गैरव्‍यवहार रोखण्‍यासाठी विधानसभेत विधेयक मांडणार : व्‍हिएगस

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : किनाऱ्यांवरील बेकायदा व्यवसायांना आळा घालण्‍यासाठी विधानसभा अधिवेशनात आपण विधेयक मांडणार आहे, असे आमदार व्हेंझी व्‍हिएगस यांनी सांगितले. कोलवा किनाऱ्याची पाहणी केल्‍यानंतर ते बोलत होते. (Need to maintain order on Colva beach)

कोलवा समुद्रकिनाऱ्यावर सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे. यासाठी पोलिस व पर्यटन खात्‍याने आपली जबाबदारी पार पाडायला हवी. किनारी भागांत चालणाऱ्या गैरकारभाराला आळा घालण्यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे. यासाठी विशिष्‍ट प्रणाली आखून येथील व्यवसायाला चालना देण्यात येईल, असे व्‍हिएगस म्‍हणाले. किनाऱ्यावर दारू (Alcohol) पिण्यासाठी बंदी असूनही पर्यटक (Tourist) दारूच्या बाटल्या घेऊन येतात. फेरीवाल्यांच्या संचारास बंदी असूनही त्यांचा वावर वाढतोय. तसेच अन्य गैरकृत्‍यांनाही ऊत आला आहे. आपण स्थानिक पंचायतीला विश्वासात घेऊन यावर तोडगा काढणार असल्‍याचे व्‍हिएगस यांनी किनाऱ्याची पाहणी केल्‍यानंतर सांगितले.

कॉन्‍स्‍टेबल करतो खंडणी वसूल!

यावेळी आमदारांनी (MLA) स्थानिक पोलिसांच्‍या कारभारावरही ताशेरे ओढले. ते म्‍हणाले की, कोलवा पोलिस (Police) स्‍थानकात जो कॉन्‍स्‍टेबल आहे, तो कधीही गणवेश घालत नाही. त्‍याला काही वरिष्‍ठ अधिकारीही दचकून असतात. रस्त्यावरील विक्रेत्यांपासून ते पंचतारांकित हॉटेल्सपर्यंत हा कॉन्‍स्‍टेबल खंडणी वसूल करीत असल्याचा आरोप त्‍यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत पोलिस व पर्यटन खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पर्वरी – चोडणला जोडणाऱ्या पुलासाठी 275 कोटींची निविदा; काम वेळेत पूर्ण न झाल्यास दिवसाला 13.74 लाख द्यावी लागणार नुकसान भरपाई

"इतिहासाचा बदला घ्यावाच लागेल...!"; अजित डोवाल यांनी शत्रूंना सुनावले खडे बोल; भारतीय तरुणांना दिला धगधगत्या क्रांतीचा मंत्र VIDEO

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT