Students inspecting a packed exhibition at the Science Film Festival. Dainik Gomantak
गोवा

‘नवभारत’ निर्माणासाठी युवाशक्तीची गरज: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सातव्या भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन

दैनिक गोमन्तक

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘नवभारत’ निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र त्‍यासाठी युवकांचा पुढाकार महत्वाचा आहे. जगासाठी आपण विविध गोष्टी तयार करूया. हा देश ‘विश्‍वगुरु’ होण्याकडे वाटचाल करत आहे आणि ती शक्ती जर कोण असेल तर ते माझ्यासमोर बसलेले युवक होय. हा विज्ञान चित्रपट महोत्सव तुम्‍हांला अनेक बाबतीत प्रेरित व प्रोत्‍साहित करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

सातव्‍या भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाच्‍या उद्‌घाटनप्रसंगी मुख्‍यमंत्री बोलत होते. व्‍यासपीठावर इस्त्रोचे डॉ. टी. पी. दास, जयंत सहस्त्रबुद्धे, सागर साळकर व गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन उपस्थित होते.

तुम्ही विद्यार्थी भाग्यवान आहात कारण तुम्‍हाला विज्ञान चित्रपट महोत्सव पाहायला मिळत आहे. त्यासाठी सर्वात प्रथम गोवा विज्ञान परिषदेचे अभिनंदन. देशातील कित्येक विद्यार्थी विज्ञान चित्रपट पाहण्यासाठी आतुरलेले असतात. मात्र आम्ही गोमंतकीय खूप नशिबवान आहोत की 2015 पासून आम्हाला हा महोत्‍सव अनुभवायला मिळत आहे, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

देशाची मोठी प्रगती: गोव्यातील विद्यार्थ्यांना आपल्या देशात विज्ञानाचा विकास कसा होतोय आणि विज्ञान आपण कसे आत्मसात केले पाहिजे याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न होतोय. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात गेल्या 75 वर्षांत आपल्या देशाने मोठा विकास केला, पण अजून देश विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वावलंबी, आत्मनिर्भर व्हायचा आहे. त्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे, असे जयंत सहस्त्रबुद्धे म्हणाले. तर, सागर साळगावकर म्हणाले, विज्ञान आपल्या जीवनाचा भाग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT