Rajarshi Shahu Maharaj Dainik Gomantak
गोवा

Rajarshi Shahu Maharaj: जाती-धर्माच्‍या भिंती भेदण्‍यासाठी शैक्षणिक क्रांतीची गरज- मोहिते

‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज’ विषयावरील व्‍याख्‍यानात काढले उद्‌गार

गोमन्तक डिजिटल टीम

Rajarshi Shahu Maharaj समाजातील भेदभाव आणि जाती-धर्माच्‍या भिंती नष्ट करायच्या असतील तर पुरोगामी विचारसरणी आणि शैक्षणिक क्रांतीची गरज आहे. ही गोष्ट हेरून नकारार्थी रुढी आणि परंपरांना मूठमाती देण्यासाठी शाहू महाराजांनी धाडसी निर्णय घेतले.

शाहू महाराज हे कार्यतत्पर तेवढेच कुशल राज्यकर्ते होते. म्हणूनच अवघ्या विसाव्या वर्षी स्वीकारलेला राजमुकूट त्यांनी लीलया पेलला, असे मत महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आणि विचारवंत ॲड. संभाजीराव मोहिते यांनी व्यक्त केले.

कोकण मराठी परिषद गोमंतक साहित्य सेवक मंडळ आणि प्रागतिक विचारमंच गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज’ या विषयावरील व्याख्यानात ते वक्ते म्हणून बोलत होते.

यावेळी कोमपचे सल्लागार ॲड. रमाकांत खलप, गोसासेचे अध्यक्ष रमेश वंसकर, प्रागतिक विचारमंच गोवाचे अध्यक्ष जयवंत आडपईकर, कोषाध्यक्ष साळू भगत व्यासपीठावर उपस्थित होते. फोंडा येथील थ्रिफ्ट सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.

आपत्तीच्या काळात रोजगारनिर्मिती आणि रोजगार हमीची अंमलबजावणी करून शाहू महाराजांनी जनतेच्या उत्कर्षाचा मार्ग खुला केला, असे मोहिते म्हणाले.

प्रागतिक विचार मंचचे अध्यक्ष जयवंत आडपईकर यांच्‍या हस्ते भेटवस्तू देऊन ॲड. मोहिते यांना सन्मानित करण्यात आले. बिभीषण सातपुते, गो. रा. ढवळीकर, का. बा. मराठे, नारायण महाले, रामनाथ गावडे, प्रकाश तळवडेकर, विनोद नाईक आदी साहित्यिक यावेळी उपस्थित होते.

शाहू महाराजांचे मौलिक कार्य

पाण्याचे प्रचंड जलसाठे निर्माण करण्याबरोबरच शाहू महाराजानी शाश्‍वत पर्यावरणाची काळजी घेतली. त्यांच्या राजकीय कारकीर्दीत राज्यासमोरील समस्या कुटनीती, राजनीती राजशास्त्र आणि सुशासनाच्या मार्गातून त्यानी नष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

अंधश्रद्धेला कारणीभूत असलेल्या भ्रामक कल्पना, शैक्षणिक क्रांती, वैचारिक क्रांती याबरोबरच जातीच्या विषमतेचे उच्चाटन करण्यासाठी ते उत्स्फूर्तपणे वावरले. देवदासी मुलींना हक्क प्रदान करणारा कायदा केला.

पुनर्विवाहाला नकार दिला. प्लेगची साथ समाप्त करण्यासाठी कडक उपाययोजना आणि औषधोपचार या गोष्टीवर भर दिला, असे ॲड संभाजीराव मोहिते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT