CCTV Dainik Gomantak
गोवा

Forest Department: तांबडी-सुर्ला वन खात्याच्या गेटवर ‘सीसीटीव्ही’ची गरज

Forest Department: अपघात, गुन्‍हे वाढले : दररोज मोठ्या संख्येने येतात देशी-विदेशी पर्यटक; नियंत्रण आवश्‍‍यक

दैनिक गोमन्तक

Forest Department: तांबडी-सुर्ला येथे वन खात्याच्या गेटजवळ सीसीटीव्ही कॅमेरे अजूनही बसविण्यात आला नसल्याने गुन्ह्यांचा तपास करणे अवघड होत आहे.

येथील प्रसिद्ध श्री महादेव मंदिर परिसरात येणाऱ्या पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे काळाची गरज बनली आहे.

तांबडी-सुर्ला येथे दररोज मोठ्या संख्येने देश-विदेशी पर्यटक भेट देतात. काही दिवसांपूर्वी ८० वर्षीय स्थानिक वृद्ध महिलेचा या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली होती. पहिल्‍यांदा अज्ञात वाहनाची धडक बसून तिचा मृत्यू झाल्याचा संशय होता.

तसेच पाच वर्षांपूर्वी येथील नदीच्‍या किनाऱ्यावर फोंडा येथील एका व्यावसायिकाचा खून झाला होता. त्यावेळी वन खात्याच्या गेटवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने या गुन्ह्याचा छडा लावण्यास पोलिसांना वेळ लागला होता.

या परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने काही आगळीक घडल्यास अथवा गुन्हा घडल्यास त्याचा छडा लावण्याकरिता वन खात्याच्या गेटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे काळाची गरज बनली आहे.

पर्यटकांच्या वाहनांची नोंद ठेवण्यासाठी वन खात्याने गेटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची नितांत गरज असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले

अभयारण्य परिसर, अरुंद रस्‍ता

तांबडी-सुर्ला परिसरात धारगे, तळडे व तांबडी-सुर्ला या गावातील लोक दररोज वन खात्याच्या गेटमधून येजा करीत असतात. तेथे कर्मचारी दिवस-रात्र तैनात असतात. हा भाग अभयारण्यात येतो. तसेच रस्ताही अतिशय अरुंद आहे.

या भागात पर्यटक वाहनांची नेहमीच वर्दळ असते. रस्ता ओलांडताना एखादे भरधाव वाहन कुणालाही ठोकरून पळून गेल्यास तपास करणे पोलिसांना अवघड होते. कारण गेटवर सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT