Goa News: साकोर्डा पंचायत इमारतीच्‍या कामाला ‘ग्रहण’

Goa News: कंत्राटदार ‘सुशेगाद’ : तब्‍बल सहा वर्षे रेंगाळलेय नूतनीकरण; ग्रामस्‍थांत संताप
Goa News: साकोर्डा पंचायत इमारतीच्‍या कामाला ‘ग्रहण’
Published on
Updated on

संतोष च्यारी

Goa News: धारबांदोडा तालुक्यातील साकोर्डा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या पंचायत मालकीच्या जुन्या इमारतीचे बाजार संकुल तथा बहुउद्देशीय सभागृह नूतनीकरणाचे काम गेल्या सहा वर्षांपासून रेंगाळत ठेवल्याने या प्रकल्पाचा मूळ उद्देशच नष्ट झाला आहे.

Goa News: साकोर्डा पंचायत इमारतीच्‍या कामाला ‘ग्रहण’
Papaya Leaves For Dengue: पपईच्या पानांनी खरोखर डेंग्यू बरा होऊ शकतो का? जाणून घ्या सत्य

कधी पूर्ण होईल हे काम अशी विचारणा ग्रामस्थ करीत असले तरी ते पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे ‘सरकारी काम आणि किती काळ थांब?’ असा सवा‍ल विचारण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे.

सदर प्रकल्पाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराने घेतलेल्या वेळकाढू धोरणामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत त्‍याच्‍यावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी अनेकदा पंचायतीच्या ग्रामसभेत करण्यात आली आहे. या प्रकल्पावरून बऱ्याचदा पंचायत मंडळाला ग्रामस्थांनी धारेवरही धरले आहे, पण अजून हे काम काही पूर्ण झालेले नाही.

१७ ऑक्टोबर २०१७ रोजी मोठ्या थाटामाटात नूतनीकरण करण्यात येणाऱ्या इमारतीची पायाभरणी करण्‍यात आली. मात्र आता सहा वर्षे होत आली तरी इमारत नूतनीकरणाचे काम पूर्णत्वास आलेले नाही.

Goa News: साकोर्डा पंचायत इमारतीच्‍या कामाला ‘ग्रहण’
Acne Causing Foods: सावधान! या खाद्यपदार्थांमुळे मुरुमे होऊ शकतात

हे काम लवकर सुरू करायचे असल्याने जुन्या इमारतीतील व्यावसायिकांच्‍या मागे साहित्‍य खाली करण्यासाठी पंचायत मंडळाने तगादा लावला होता. त्यामुळे व्यावसायिकांनी घाईघाईने साहित्‍य खाली करुन व्यावसायिक इतरत्र स्थायिक झाले. त्यानंतर इमारतीचे छप्पर पूर्णपणे खाली उतरविण्यात आले. या सामुग्रीचा विषय अनेकदा पंचायत ग्रामसेभेत चर्चेला येऊन गरमागरम चर्चा होत असते.

उतरविण्यात आलेल्या जुन्या इमारतीच्या साहित्‍यापैकी काही चोरीला गेले होते. विशेष म्हणजे कंत्राटदाराचे त्‍यावर अजिबात नियंत्रण नव्हते. काही महिन्यानंतर इमारतीचा पाया रचण्यासाठी यंत्राच्या साहाय्याने खांब उभे करण्यासाठी खड्डे खोदण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाले, पण सुरक्षिततेच्या अभावामुळे लोकांना तसेच जनावरांना देखील धोकादायक बनले. त्यावेळी काही जनावरे खड्ड्यात पडून जखमी होण्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर कंत्राटदाराला जाग आली होती.

सध्या इमारतीच्या तळमजल्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. कामगार अनेक महिन्यांपासून गायब आहेत. निवडणुका जवळ आल्यावर कंत्राटदार इमारतीचे काम सुरू करतो आणि निवडणुका संपल्या की बंद करतो, अशी कुजबूज सध्या पंचायत परिसरातर सुरू आहे.

नियोजित वेळेतच पूर्ण व्हावेत प्रकल्प : सरकार पातळीवरील प्रकल्प हे नियोजित वेळेतच पूर्ण व्हायला हवेत, अन्यथा ते इतरांना त्रासदायक ठरतात. हे नूतनीकरणाचे काम वास्तविक निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकारी प्रशासनाने प्रयत्‍ने करणे गरजेचे होते. पण तसे काही होताना दिसत नाही. त्यामुळे सहा वर्षे काम रखडले आहे. या रखडलेल्या कामामुळे खर्चाचे प्रमाण वाढत असून कामाच्या ठिकाणी दर्जाचा प्रश्न उपस्थित होत असतो.

व्यावसायिकांच्‍या मागे लावला होता पंचायतीने तगादा

इमारत नूतनीकरणाचे काम लगेच पूर्ण होईल, असा आव त्यावेळी प्रशासनाने आणला होता. पंचायत मंडळानेही त्यावेळी व्यावसायिकांच्‍या मागे इतरत्र स्थलांतर करण्याचा तगादा लावला होता. या व्यावसायिकांनी काम लवकर पूर्ण होईल, आपल्यामुळे आणखी अडचण होऊ नये यासाठी घाईघाईत स्थलांतर केले. मात्र आता सहा वर्षे होत आली तरी अजून घोडे काही पुढे गेलेले नाही. हे नूतनीकरणाचे काम आता कधी पूर्ण होणार, असा सवाल करण्यात येत आहे.

सावर्डेचे माजी आमदार तथा माजी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊसकर यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून पंचायत इमारत नूतनीकरण कामाला प्रारंभ करण्यात आला होता. प्रकल्पाला सहा वर्षे झाली, तरी ठेकेदाराच्या वेळकाढू धोरणामुळे हे काम रेंगाळले आहे. याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार आहे. ठेकेदाराने पंचायत इमारत नूतनीकरणाचे काम वेळेत पूर्ण केले नसल्याने पंचायतीचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.

- शिरीष देसाई, उपसरपंच-साकोर्डा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com