गुजरातमधील (Gujarat) मोरबी भागात रविवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी मोठी दुर्घटना घडली. यामध्ये मच्छू नदीत केबल पूल कोसळला (Bridge Collapse), या दुर्घटनेत सुमारे 130 जणांचा मृत्यू झाला आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी गुजरात सरकार या दुर्घटनेला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
(NCP leader Clyde Crasto allegations morbi bridge collapse Gujarat govt must be held responsible)
मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमधील (Gujarat)मोरबी येथील पूल कोसळला आहे. यावरुन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी गुजरात सरकारवर निशाना साधला, गुजरातमधील मोरबी येथील पूल कोसळण्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली.
या घटनेसाठी गुजरात सरकारला जबाबदार धरले पाहिजे कारण या पुलाचा अहवाल असे सूचित करतो की, नुकतंच या पूलाचे नूतनीकरण झाले होते. या पुलाचे काम ‘सरकारी निविदा’ प्राप्त झाल्यानंतर करण्यात आले. सरकारी प्रक्रिया पार करत काम करण्यात आले आहे. तर ही घटना घडलीच कशी? असा खडा सवाल त्यांनी केला.
क्रास्टो म्हणाले, गुजरात सरकारकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्याशिवाय हा पूल पुन्हा खुला करण्यात का आला ? या घटनेत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत आणि लोक अजूनही काही नागरिक बेपत्ता आहेत. गुजरातचे अधिकारी या घटनेपासून स्वत:ची सुटका करू शकत नाहीत आणि पुलाचे नूतनीकरण करणाऱ्या खासगी कंपनीही तितक्याच जबाबदार आहेत. त्यामूळे केंद्र सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.