Vasco येथील दोन घरे आगीत भस्मसात; जीवितहानी नाही

दोन्ही घरातील प्रापंचिक साहित्य जळाले
 fire
fireDainik Gomantak

आज सायंकाळी वास्को येथील दोन घरांना आग लागली असल्याची घटना घडली आहे. लागलेल्या आगीमध्ये दोन्ही घरातील प्रापंचिक साहित्य जळाले असून या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

( Two houses in Driver Hill Vasco were destroyed in the fire )

 fire
Goa: सायबर चोरट्यांचा पर्यटकांच्या पैशांवर डल्ला; हॉटेल बुकिंगच्या नावाखाली लाखो रूपयांची फसवणूक

मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी वास्को येथील ड्रायव्हर हिल (Driver Hill ) या परिसरातील दोन घरांना अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना सायंकाळी 6 च्या दरम्यान घडली असून यात घरातील प्रापंचिक साहित्य जळाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर अग्निशमन दलाने आपल्या फौजफाट्यासह दाखल होत काही आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

 fire
Deviya Rane: आमदार होताच कामाचा धडाका; पर्येत दिव्या राणेंकडून विविध विकासकामांना हिरवा कंदील

सध्या ही आग आटोक्यात आली असून अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केल्याने या परिसरातील इतर घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचली. मात्र आग लागण्याचं नेमकं कारण काय हे अद्याप समजलेलं नाही. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की अचानक या दोन घरांमधून धुराचे लोट उठू लागले. मात्र आग लागण्याचं नेमकं कारण समजू शकलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com