Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

NCB ची गोव्यात मोठी कारवाई; 25 किलो अंमली पदार्थासह दोन महिलांना अटक

अधिकाऱ्यांनी 2 महिलांना अटक केले, यांच्याकडून जवळपास 25 किलो गांजा आणि MDMA च्या काही गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांपासून मुंबईबरोबरच देशात अनेक ठिकाणी अमली पदार्थांच्या तस्करीच्या अनेक घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबई एनसीबीने कोल्हापुरात एका फार्म हाऊसवर छापेमारी करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला होता. ही घटना ताजी असतानाच मुंबई (Mumbai) एनसीबीने गोव्यात एक मोठी कारवाई (NCB) केली आहे.

मुंबई आणि गोवा एनसीबीने (Goa NCB) काल संयुक्तपणे उत्तर गोव्यातील (North Goa) अर्पोरा (Arpora) याठिकाणी छापेमारी केली आहे. यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी 2 महिलांना अटक केले, यांच्याकडून जवळपास 25 किलो गांजा आणि MDMA च्या काही गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्या दोन महिलांमधील एक महिला विदेशी असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित दोघींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने (Court) दोघींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या घटनेचा पुढील तपास मुंबई एनसीबी आणि गोवा एनसीबी संयुक्तपणे करत आहेत. आरोपी महिल्यांच्या चौकशीमध्ये अमली पदार्थाचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता वर्तवली आहे. ती विदेशी महिला कोणत्या देशाची आहे? याविषयी अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस (Police) करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

SCROLL FOR NEXT