Drowned Woman in mhadei river Missing Dainik Gomantak
गोवा

Mhadei River Accident: म्हादईत बुडालेली ‘ती’ महिला अजून सापडली नाही; आता नौदलाला पाचारण

Mhadei River Missing Women: बेकायदा रेती उत्खनन करताना तार, सावर्डे येथील म्हादई नदीतील दुऱ्याची कोंड पात्रात बुडालेल्या सुवर्णा गावकर या महिलेचा अद्याप शोध लागलेला नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Drowned Woman in Mhadei River Missing

वाळपई: बेकायदा रेती उत्खनन करताना तार, सावर्डे येथील म्हादई नदीतील दुऱ्याची कोंड पात्रात बुडालेल्या सुवर्णा गावकर या महिलेचा अद्याप शोध लागलेला नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन दिवस युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली, मात्र यश आले नाही. त्यामुळे आता नौदलाची मदत घेण्यात येणार आहे.

नदी पात्रातील रेती वाहून नेताना होडी उलटल्याने तीन महिलांसह एकूण चौघेजण पाण्यात पडले होते. त्यापैकी दोघा महिलांसह तिघे वाचले, पण सुवर्णा गावकर ही महिला पाण्यात बुडाली. ही घटना शनिवारी घडली.

गेले दोन दिवस वाळपई अग्निशमन दलाचे अधिकारी संतोष गावस यांनी मार्गदर्शनाखाली जवान नदी पात्रात शोध घेत आहेत, परंतु त्यांना यश न आल्याने आता नौदलाच्या पाणबुड्यांची मदत घेण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी नौदलातर्फे शोधकार्य हाती घेतील.

म्हादईचे पात्र सुमारे २० मीटर खोल असून या पात्रात मगरींचा देखील असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. स्थानिक शोध कामास मदत करीत आहेत.

सोमवारी दुपारी सत्तरी मामलेदार धीरेन बाणावलीकर तसेच वाळपई पोलिस निरिक्षक विदेश शिरोडकर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून शोधकार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी पुढे शोध सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT