Navelim water pipe line burst  Dainik Gomantak
गोवा

Navelim News : नावेलीत जलवाहिनी फुटल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल

Navelim News : आज या भागात वीजपुरवठाही बंद असल्याने लोकांचे हाल झाले आहेत, असे कुतिन्हो यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Navelim News :

सासष्टी, नावेलीत शनिवारी रात्री जलवाहिनी फुटल्याने परिसरातील नागरिकांचे पाण्याविना हाल झाले. भूमिगत वीजवाहिन्यांचे काम सुरू असताना ही जलवाहिनी फुटल्याचे सांगण्यात येत आहे.

शॅडो कौन्सिलचे निमंत्रक व काँग्रेस नेते सावियो कुतिन्हो यांनी सांगितले, की दोन वर्षांपूर्वी जलवाहिनीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. आता दोन वर्षे पूर्ण झाली तरी ही तात्पुरतीच व्यवस्था राहिली आहे. जलवाहिनी व वीजवाहिन्या समांतर असल्याने एक जरी वाहिनी नादुरुस्ती झाली किंवा फुटली, तर दुसऱ्या वाहिनीला परिणाम होणारच

आज या भागात वीजपुरवठाही बंद असल्याने लोकांचे हाल झाले आहेत, असे कुतिन्हो यांनी सांगितले.

मडगावमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून विकासकामे केली जात आहेत. त्यांचासुद्धा हाच दर्जा आहे का? असा सवालही कुतिन्हो यांनी केला. विकासकामांच्या नावांवर गैरकारभार व भ्रष्टाचार माजल्याचे ते म्हणाले.

पाणीपुरवठ्याची वाहिनी फुटणे हे नित्याचेच झाले आहे. आम्हाला हा प्रश्र्न कायमस्वरूपी सोडवला गेला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT