Power Minister Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Naveli Electricity : नावेलीत वीज कामांना प्रारंभ वीज सुविधांसाठी केंद्राकडून ६८९ कोटींचा निधी

ही कामे केंद्र सरकारच्या ‘आरडीएसएस’ (रिव्हेम्पड डिस्ट्रीब्युशन सेक्टर स्किम) पॅकेज वन योजने अंतर्गत हातात घेतलेली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Naveli Electricity : सासष्टी, वेळ्ळी, मडगाव व नावेली मतदारसंघातील वीज पुरवठा सुधारणेसाठीच्या कामाचा शुभारंभ आज वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

ही कामे केंद्र सरकारच्या ‘आरडीएसएस’ (रिव्हेम्पड डिस्ट्रीब्युशन सेक्टर स्किम) पॅकेज वन योजने अंतर्गत हातात घेतलेली आहेत.

या योजने अंतर्गत राज्यातील वीज क्षेत्र सुधारणेसाठी केंद्राने ६८९ कोटींचा निधी उपलब्ध केल्याची माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज दिली. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय वीजमंत्री आर. के. सिंग यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

या योजने अंतर्गत कामासाठी केंद्र सरकार ६० टक्के तर राज्य सरकार ४० टक्के निधी उपलब्ध करणार असल्याची माहिती वीज मंत्र्यांनी दिली. आज ज्या कामांचा शुभारंभ केला त्यातून सासष्टीतील ८० टक्के मतदारसंघांचा समावेश आहे, असे ते म्हणाले.

नावेलीत सुविधा

जवळ जवळ ८७ कोटी रुपया खर्च करुन नावेली मतदारसंघात भूमिगत वीज वाहिन्या घातल्या जाणार आहेत. आमदार उल्हास तुयकेर निवडून आल्यापासुन या कामाच्या पुर्ततेसाठी प्रयत्नशील आहे.

वीज मंत्री सुदिन ढवळीकर नींनी सांगितले की या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया सुरू आहे. दोन महिन्यांत या कामाला सुरवात होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT