Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : नौसेना युद्ध महाविद्यालय गोव्यात; ५ मे रोजी राष्ट्रार्पण

Goa News : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग राहणार उपस्थित

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

पणजी, भारतीय सेनेतील अधिकाऱ्यांना युद्धनीती, सुरक्षा आदी संबंधात प्रशिक्षण देण्यात येत असलेल्या नौसेना युद्ध महाविद्यालयाच्या चोला नामक नव्या इमारतीचे राष्ट्रार्पण ५ मे रोजी रक्षामंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार असल्याचे कमांडंट रिअर ॲडमिरल अर्जुन देव नायर यांनी सांगितले.

ते आयएनएस मांडवी, वेरे येथे आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलत होते. नायर म्हणाले की, या इमारतीत भारतीय संस्कृतीचे गुरुशिष्य परंपरेचे प्रतीकांवर आधारित बांधकाम करण्यात आले असून नौसेनेच्या बळावर आपल्या साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या राजेंद्र चोला यांच्या चोला साम्राज्याचे नाव या इमारतीला देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यासाठी अभिमानास्पद बाब

२०१० साली नौसेना युद्ध महाविद्यालय गोव्यात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापूर्वी हे महाविद्यालय मुंबईत होते. गोव्याला नौसेनेचा मुक्तीपूर्व आणि मुक्तीकाळातील इतिहास आहे. गोव्यात हे महाविद्याल उभारण्यात आल्याने गोव्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.

थोडक्यात महत्त्वाचे

१९ हजार चौ.मी.मध्ये इमारतीचे बांधकाम

२४४ एकराचा एकूण परिसर

पर्यावरणपूरक इमारत

भारतीय परंपरा इतिहासाचे जतन

इमारतीला ग्रीहा-३ रेटिंग

२४० वर्षाचा भव्य वटवृक्षाचे संवर्धन

गुरू-शिष्य परंपरेचे प्रतीक

या इमारतीचा आकार इंग्रजी ९ आकड्यासारखा असून जे पूर्णत्व आणि उत्कर्षाचे प्रतीक आहे. या इमारतीच्या बांधकामाला तीन वर्षाचा कालावधी लागला असून डिसेंबर २०२३ मध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले.

सुमारे ८० कोटी रुपये खर्च झाला आहे. एकूण पाच मजली या इमारत असून अभ्यासक्रम, संशोधन व इतर बाबींसाठी तीचा वापर करण्यात येणार आहे. इमारतीच्या मध्यभागी २४० वर्षाचा भव्य वटवृक्षाचे संवर्धन करण्यात आले आहे. ही इमारत भारतीय गुरू-शिष्य परंपरेचे प्रतीक असल्याचे कमांडंट अर्जुन देव नायर यांनी सांगितले.

पर्यावरणपूरक इमारत

शाश्‍वतता आणि पर्यावरणाच्या अनुषंगाने या इमारतीचे बांधकाम ग्रीहा-३ नियमांप्रमाणे करण्यात आले आहे.

इमारतीत १० लाख लिटर पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. १०० केव्ही एवढी वीज निर्मिती करू शकेल एवढे सौर पॅनेल इमारत परिसरात बसविण्यात आल्याचे कमांडंट नायर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

SCROLL FOR NEXT