Malim Marina Project Dainik Gomantak
गोवा

Marina Project: वादग्रस्त ‘मरिना प्रकल्‍प’ नावशीतून मुरगाव बंदरात! पर्यटनाला देणार चालना; BOT तत्त्‍वावर उभारणी सुरू

Mormugao Port Trust: नावशी येथील प्रस्‍तावित मरिना प्रकल्‍पाला स्‍थानिकांनी दर्शवलेल्‍या तीव्र विरोधाची दखल घेत केंद्र सरकारने हा प्रकल्‍प मुरगाव पोर्ट ट्रस्‍टकडे (एमपीटी) स्‍थलांतरित केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: नावशी येथील प्रस्‍तावित मरिना प्रकल्‍पाला स्‍थानिकांनी दर्शवलेल्‍या तीव्र विरोधाची दखल घेत केंद्र सरकारने हा प्रकल्‍प मुरगाव पोर्ट ट्रस्‍टकडे (एमपीटी) स्‍थलांतरित केला आहे.

या प्रकल्‍पाच्‍या जेटी टर्मिनलचे काम युद्धपातळीवर सुरू असून, २०२७ पर्यंत ते पूर्ण होईल. हा प्रकल्‍प ‘बांधा, वापरा आणि हस्‍तांतरीत करा’ अशा तत्त्‍वावर उभारण्‍यात येत असल्‍याचे सांगत, या प्रकल्‍पामुळे राज्‍याच्‍या पर्यटनाला आणखी चालना मिळण्‍याची आशा ‘एमपीटी’च्‍या एका वरिष्‍ठ अधिकाऱ्याने ‘गोमन्‍तक’शी बोलताना व्‍यक्त केली.

नावशी येथील प्रस्‍तावित मरिना प्रकल्‍प आणि त्‍यावरून सुरू झालेला वाद गेल्‍या अनेक वर्षांपासून गाजत आहे. या प्रकल्‍पामुळे मच्‍छिमारांचा व्‍यवसाय धोक्‍यात येणार असल्‍याचा दावा करी त स्‍थानिकांनी सुरुवातीपासूनच प्रकल्‍पाला कडाडून विरोध केला. त्‍या काळात झालेल्‍या ग्रामसभांमध्‍येही या प्रकल्‍पाला विरोध दर्शवण्‍यात आला होता.

त्‍यामुळे राज्‍य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने हा प्रकल्प स्थगित केला होता. त्‍यानंतर हा प्रकल्‍प होणार नाही, याबाबत प्रश्‍‍नचिन्‍ह उभे राहिलेले असतानाच आता नावशीतून ‘एमपीटी’वर हा प्रकल्प हलवण्‍यात आल्‍याचे समोर आले आहे. हेडलँड–सडा परिसरात उभारण्‍यात येत असलेल्‍या या प्रकल्‍पाच्‍या जेटीचे काम वर्षभरात ते पूर्ण होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

सरकारला होता रोजगारवृद्धीचा विश्‍‍वास

मरिना प्रकल्‍प उभारल्‍यानंतर राज्‍यात येणारे अधिकाधिक पर्यटक वळतील. त्‍यामुळे पर्यटनाला चालना मिळण्‍यासह स्‍थानिकांना रोजगारही मिळतील, असा दावा करीत राज्‍य सरकारने या प्रकल्‍पाला हिरवा कंदिल दाखवला होता. परंतु, या प्रकल्‍पामुळे मच्‍छिमारांसमोर अनेक संकटे उभी राहण्‍याचा धोका वर्तवत स्‍थानिकांनी अखेरपर्यंत त्‍याला विरोध दर्शवला होता. यात विरोधी पक्षांनीही स्‍थानिकांना पाठिंबा दिल्‍याने सरकारला नमते घ्‍यावे लागले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बंगाल हादरले! झोपेत असताना 'मच्छरदाणी फाडून'अपहरण, लैंगिक अत्याचारानंतर 4 वर्षांची चिमुकली आढळली गटाराजवळ

Konkani Drama: सर्जनशीलतेचा प्रत्यय देणारी व्हिजुअल ट्रिट - ‘इन सर्च ऑफ सर्वायव्हल’

Goa Chess World Cup: जगज्जेत्या गुकेशचे आव्हान संपुष्टात! स्वेनने केले पराभूत; अर्जुन, प्रज्ञानंद, हरिकृष्ण, प्रणव चौथ्या फेरीत दाखल

Goa: "किती पैसे घेतेस?", गोव्यात 19 वर्षांच्या मुलीसोबत गैरव्यवहार! 'विदेशी पर्यटक' समजून अश्लील कमेंट्स; Video Viral

Goa ZP Election: बहुतांश ठिकाणी ‘झेडपीं’ची पळापळ सुरू, डिचोली वाढणार रंगत; पेडणे तालुक्यातून अनेकांचा पत्ता कट!

SCROLL FOR NEXT