Nature lover Gautam Jalmi made a telescope Dainik Gomantak
गोवा

अवकाशाचा वेध घेणारा अवलिया!

निसर्गप्रेमी गौतम जल्‍मी : बनविला टेलिस्कोप; नभमंडल केले जवळ

दैनिक गोमन्तक

Nature lover Gautam Jalmi made a telescope

पद्माकर केळकर

‘चांद्रयान-३’ने जागतिक पातळीवर भारताचे नाव उज्ज्‍वल केले आहे. अशा यशामुळेच देशातील नवीन पिढीला प्रेरणा व प्रोत्‍साहन मिळते. असाच एक युवक आजोबानगर-साखळी येथे राहणारा गौतम जल्मी.

मूळ कवळे-फोंडा येथील या 34 वर्षीय युवकाचे कार्य प्रेरणादायी आहे. त्‍याने घरी टेलिस्कोप बनविला असून त्‍याद्वारे तो स्‍वत: अवकाश दर्शनाचा मनमुराद आनंद लुटत आहे आणि दुसऱ्यांनाही देत आहे.

गौतमने सिक्कीम-मणिपाल येथून बीएससी आयटी इंजिनीयर शिक्षण घेतले आहे. या शिक्षणाचा स्‍वत:बरोबर समाजालाही कसा उपयोग होईल याचा विचार करून त्‍याने घरी टेलिस्कोप बनविला.

त्याद्वारे गेल्‍या पाच वर्षांपासून गौतम ग्रामीण भागात उंच डोंगरावर जाऊन अवकाश, निसर्ग, वनसंपदा यांचे चित्रण तसेच आकाशातील विविध घटना टिपणे, चंद्र, विविध नक्षत्रे, धुमकेतू, शुक्र, शनी आदी ग्रहांचा अभ्‍यास करतोय.

तसेच मुलांसोबत, लोकांसोबत कार्यक्रम आयोजित करून रात्रीच्यावेळी नभमंडलातील चमत्कारिक गोष्टी टिपतो. त्यातून लोकही अवकाश दर्शनाचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

तारे, ग्रहांचे निरीक्षण करणे हा गौतमचा छंदच. जंगलातील लहान प्राणी, कीटक यांचे चित्रण हा तर त्‍याच्‍या आवडीचा विषय. त्यातून निसर्गात रंग भरून आणणारे बदल पाहायला मिळतात.

पृथ्वी व आकाश हे एकरुप करून मानवी जीवन आनंदी करणारे कार्य गौतम करीत आहे. अशा समाजकार्यातून गोव्याच्‍या कानाकोपऱ्यांत फिरण्याची संधीही मिळते.

शहरी भागातील मुलांना सर्व सुविधा मिळतात, पण ग्रामीण मुलांना अशा गोष्टी दाखवून त्‍यांचा अभ्यास करण्‍याची गरज आहे. केरीचे पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांच्‍यासारख्‍या अनेक प्रेरणादायी लोकांचे विचार आत्मसात करून निसर्ग व मानवी जीवन प्रफुल्लित करण्‍याचा गौतमने विडा उचलला आहे.

पाहिलेल्‍या व टिपलेल्‍या महत्त्वपूर्ण गोष्‍टी

  • मलाबार ग्लायडींग बेडूक नर-मादी. मादी ही अंडी घालताना स्पष्टपणे दिसली. ही घटना अतिशय दुर्मीळ.

  • मलबार पीट वायपर हा विषारी साप शिकारीचा सामना करताना पाहायला मिळाला, जो केवळ पश्चिम घाटातच आढळतो.

  • बायोल्युमिनेसेंट बुरशी, जी रात्रीची ग्रीन रंगाची दिसते व त्याद्वारे रात्रीच्‍या वेळी जंगल हिरव्या रंगाने उजळलेले दिसते.

आकाशगंगा जवळून पाहण्‍याची मिळाली संधी.

निसर्गातील कुतुहल निर्माण करणाऱ्या गोष्टींचे निरिक्षण, अभ्यास गरजेचा आहे. ‘चांदसूर्या’ या नव्या ग्रुपच्या माध्यमातून राज्‍यभर उपक्रम सुरू आहेत. शालेय जीवनात खगोलशास्त्र हा स्वतंत्रच विषय सरकारने समाविष्ठ केला पाहिजे, जेणेकरून माध्यमिक दशेतच मुलांना चांगली स्वप्ने पाहून जीवनाची दिशा निश्‍चित करता येईल. बलराम हायस्कूल काणकोण, निरंकाल-फोंडा येथील कातकरी समाज, सावर्शे-सत्तरी तसेच राज्‍यात विविध ठिकाणी आपण दिवसा तसेच रात्रीच्‍या वेळी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.

- गौतम जल्मी, साखळी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT