Sanjana Prabhugaonkar Dainik Gomantak
गोवा

संजनाच्या मोहिमेची पदकासह समाप्ती

राष्ट्रीय जलतरण: चार रौप्य व एका ब्राँझसह एकूण पाच पदके

दैनिक गोमन्तक

पणजी: संजना प्रभुगावकरने 48 व्या राष्ट्रीय ज्युनियर जलतरण स्पर्धेत चार रौप्य व एका ब्राँझसह एकूण पाच पदके जिंकली. ओडिशातील भुवनेश्वर येथे झालेल्या स्पर्धेत पदके जिंकणारी ती एकमेव गोमंतकीय जलतरणपटू ठरली. स्पर्धेचा बुधवारी समारोप झाला. (National Swimming: Sanjana Prabhugaonkar wins five medals in 48th National Junior Swimming Championships )

स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी संजनाला ब्राँझपदक मिळाले. 15 ते 17 वर्षे वयोगटातील 100 मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत तिने 1 मिनिट 00.62 सेकंद वेळ देत तिसरा क्रमांक मिळविला. या शर्यतीत कर्नाटकची निना व्यंकटेश (59.91 सेकंद) हिने सुवर्ण, तर महाराष्ट्राची आन्या वाला (1 मिनिट 00.44 सेकंद) हिने रौप्यपदक जिंकले.

गोव्याला स्पर्धेत एकूण पाच पदके मिळाली, ती सर्व संजनाने जिंकली. तिने स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन रौप्यपदके प्राप्त केली. 200 मीटर फ्रीस्टाईल व 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये तिला दुसरा क्रमांक मिळाला. नंतर 50 मीटर बॅकस्ट्रोक आणि 200 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीतही तिला रौप्यपदक मिळाले.

रंगीता एंटरप्राइजेस घोटाळ्यात तीन कर्मचाऱ्यांना अटक

गोव्यातील सुमारे अडीज हजार गुंतवणूकदाराना तब्बल 9.33 कोटींचा चुना लावणाऱ्या रंगीता एंटरप्राइजेस घोटाळ्यात काल आर्थिक गुन्हेगारी विभाग पोलिसांनी स्वीजल फेर्नांडिस, लिंबाजी लमाणी व मुईद मधवाणी या तीन कर्मचाऱ्यांना अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT