भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. मात्र, यादरम्यान विराट कोहलीने क्रिकेटच्या मैदानातून जवळपास एक महिन्याचा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेक सुरू झाल्यानंतर लगेचच विराट कोहलीचा एक जबरदस्त डान्स व्हिडिओ सोशल मिडीयावर आला आहे. विराट कोहलीचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Virat Kohli Dance Video News)
विराट कोहलीच्या नवीन डान्स (Dance) व्हिडिओला बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटीही पसंती देत आहेत. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) विराट कोहलीच्या व्हिडिओचे (Video) कौतुक केले आहे. यापूर्वी वरुण धवनचा असाच डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
क्रिकेटमधून (Cricket) ब्रेक घेतल्यानंतर विराट कोहली आपल्या कुटुंबासह सुट्टीसाठी पॅरिसला (Paris) गेला आहे. विराट कोहलीची पत्नी आणि लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) इंस्टाग्रामवर पॅरिसमध्ये पोहोचल्याचे फोटो शेअर केले आहेत. यापूर्वी विराट कोहली इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या मालिकेचा भाग होता आणि तिथून थेट फ्रान्सची राजधानी पॅरिसला पोहोचला होता.
* विराट कोहली सध्या वाईट काळातून जात आहे
इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या 6 डावात विराट कोहलीला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. विराट कोहलीचा फॉर्म इतका खराब होता की त्याने 6 डावात केवळ 76 धावा केल्या. अशा खराब कामगिरीनंतर विराट कोहलीला संघातून वगळण्याची मागणी होत आहे.
विराट कोहलीने मात्र फॉर्ममध्ये येण्यासाठी बीसीसीआयकडे (BCCI) ब्रेक मागितला होता. बीसीसीआयने विराट कोहलीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेतून विश्रांती दिली आहे. पुढील महिन्यात खेळल्या जाणाऱ्या आशिया कपसाठी विराट कोहली टीम इंडियात पुनरागमन करू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.