National Service Scheme  Dainik Gomantak
गोवा

National Service Scheme : ‘केशव स्मृती’च्या ‘एनएसएस’ शिबिराला कोलवाळ येथे प्रारंभ

प्राचार्य शंकर गावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, राष्ट्रीय सेवा योजनेनिमित्त जी संधी मिळालेली आहे, त्या संधीचा तुम्ही लाभ घ्यावा.

गोमन्तक डिजिटल टीम

National Service Scheme : दाबोळी, केशव स्मृती उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवशीय निवासी शिबिराचे श्रीराम विद्यालय, कोलवाळ येथे रीतसर उद्घाटन करून शिबिराला प्रारंभ झाला.

प्राचार्य शंकर गावकर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे पदाधिकारी योगेश मांद्रेकर, सस्मीत नाईक, उर्वशा परब, तसेच शिक्षक सचिन शिरोडकर यांनी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात केली.

प्राचार्य शंकर गावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, राष्ट्रीय सेवा योजनेनिमित्त जी संधी मिळालेली आहे, त्या संधीचा तुम्ही लाभ घ्यावा.

राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना सांगताना त्यात सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व स्पष्ट करतात. खरे तर शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी.

युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा. हा एकमेव उद्देश या योजनेचा आहे. म्हणून प्रत्येकाने हा उद्देश लक्षात घेऊन समर्पित भावनेने कार्य करावे, असेही ते म्हणाले.

हे निवासी शिबिर २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या सात दिवसांत सकाळी योगानंतर अनेक उपक्रम तसेच करमणुकीचे कार्यक्रम, स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सूत्रसंचालन शिक्षिका दीक्षा डिसोजा यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Today's Live Updates Goa: "कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात सरकारने कडक कारवाई करणे आवश्यक"

IFFI 2024: चित्रपट कार्यशाळेत डॉ. इंद्रनीलनी सांगितली भारतीय चित्रपट मागे राहण्याची कारणे; म्हणाले की 'डिजिटल माध्यमांमुळे सिनेसृष्टीचे भविष्य..'

Goa App: 8.43 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवण्याची संधी हुकली; गोव्याचा उद्योग अमेरिकेत Tim Draper च्या शोमध्ये झळकला पण...

गोव्याला ‘रेड लाइट एरिया’ बनवू नका! एस्कॉर्ट सेवेवर कठोर कारवाईची सिल्वेरा यांची मागणी

ड्रोनने ठेवली जाणार Iffi, Exposition वर नजर; 1,500 पोलिस, IRB फोर्स तैनात! पर्यटन सुस्साट, हॉटेल्स फुल्ल!

SCROLL FOR NEXT