Bicholim: स्वप्नेश शेर्लेकरविरुद्ध गुन्हा नोंद, डिचोली पोलिसांकडून सहा तासांच्या चौकशीनंतर सुटका

Swapnesh Sherlekar Bicholim case: कारापूर येथील जमीन हडप प्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे.
Swapnesh Sherlekar Bicholim case
Swapnesh Sherlekar Bicholim caseDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: कारापूर येथील जमीन हडप प्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे. याप्रकरणी कारापूरच्या ‘एसटी’ समाज बांधवांना सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांच्या विरोधात डिचोली पोलिसांनी धमकीच्या आरोपाखाली गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान, डिचोली पोलिसांनी स्वप्नेश शेर्लेकर यांची सुमारे सहा तास चौकशी केल्यानंतर रात्री साधारण नऊ वा. त्यांना बाहेर सोडले. उद्या पुन्हा त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Swapnesh Sherlekar Bicholim case
Goa Crime: मायणा-कुडतरीत खळबळ! फूस लावून पळवून अल्पवयीन मुलीचं अपहरण, संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल; पालकांचा गंभीर आरोप

दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि अन्य कार्यकर्त्यांसह स्वप्नेश शेर्लेकर हे पोलिस स्थानकातून बाहेर येताच बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

कारापूर-सर्वणच्या पंचसदस्य तन्वी सावंत यांनी शेर्लेकर यांच्या विरोधात जमाव करून जीवे धमकी दिल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीवरून डिचोली पोलिसांनी शेर्लेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शेर्लेकर यांना दुपारी ३ वा. पोलिस ठाण्यात आणून चौकशी सुरू केली होती.

Swapnesh Sherlekar Bicholim case
Natasa Stankovic Goa Vacation: हार्दिक पांड्याची एक्स-वाईफ गोव्याच्या किनाऱ्यावर! नताशाचा किलर अन् सिझलिंग लूक घालतोय 'मोहिनी'; हटके अंदाज व्हायरल

वादाची पार्श्वभूमी

कारापूर येथील एका मेगा प्रकल्पाच्या वादातून कारापूरच्या ‘एसटी’ बांधवांनी सकाळी कारापूर-सर्वण पंचायतीवर धडक दिली होती. यावेळी समाजकार्यकर्त्यांसह स्वप्नेश शेर्लेकर उपस्थित होते. तिथे पंच तन्वी सावंत यांनी शेर्लेकर यांच्या दिशेने बोट करत ‘एसटी’ बांधवांना भडकावून घरी पाठवले होते, असा आरोप केला होता. जमीन हडप वादातूनच शेर्लेकरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे,अशी माहिती मिळाली होती. तक्रार खोटी असल्याचा दावा एसटी बांधवानी केला आहे.

सरकारवर टीका

स्वप्नेश शेर्लेकर यांना अटक होणार, अशी खबर वाऱ्यासारखी सर्वत्र पसरताच खासदार विरियातो फर्नांडिस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गोवा फॉरवर्डचे संतोषकुमार सावंत आदी राजकीय नेत्यांसह रामा काणकोणकर,शंकर पोळजी, मनीषा उसगावकर, ॲड. अजय प्रभूगावकर आदी सामाजिक कार्यकर्ते पोलिस स्थानकावर जमा झाले होते. जोपर्यंत शेर्लेकर यांना सोडणार नाही, तोपर्यंत पोलिस ठाण्यावरून हलणार नाही, असा निर्धार करून सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com