Goa Liberation Struggle Dainik Gomatak
गोवा

गोवा मुक्तीसंग्रामावर 26 रोजी राष्ट्रीय परिसंवाद

राष्ट्रीय परिसंवादात क्रांतीवीरांनी गोवा मुक्तीलढ्यात दिलेल्या अमूल्य, निःस्वार्थी योगदानाचा त्याचबरोबर त्यांनी शब्दबद्ध केलेल्या विविध साहित्यकृतींचा संशोधनात्मक आलेख या परिसंवादात मांडण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा मराठी अकादमी तसेच मराठी विभाग, संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालय पेडणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.26 फेब्रुवारी रोजी गोवा मुक्तीसंग्राम आणि मराठी साहित्य या विषयावर आधारीत एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय परिसंवादात क्रांतीवीरांनी गोवा मुक्तीलढ्यात (Goa liberation Day) दिलेल्या अमूल्य, निःस्वार्थी योगदानाचा त्याचबरोबर त्यांनी शब्दबद्ध केलेल्या विविध साहित्यकृतींचा संशोधनात्मक आलेख या परिसंवादात मांडण्यात येणार आहे. (National Seminar on 26th Goa Liberation Struggle in pernem)

परिसंवादाच्या उद्‌घाटन सत्राला प्रमुख अतिथी म्हणून गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन उपस्थित असतील, बीजभाषण डॉ. विनय मडगावकर, प्राध्यापक, मराठी विभाग गोवा विद्यापीठ करतील तर परिसंवाद समन्वय डॉ. नीता तोरणे असतील. या सत्रात निवृत्त नौदल सैनिक अनिल विश्राम बोंद्रे यांचा सत्कार केला जाईल.

प्रथम सत्रात डॉ. विनय मडगावकर बीजनिबंध सादर करतील. द्वितीय सत्रात गोवा मुक्ती संग्राम आणि मराठी कविता या विषयावर होणार असून या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ.विनोद गायकवाड, मराठी विभाग प्रमुख, राणी चनम्मा विद्यापीठ, कर्नाटक भूषवतील तर डॉ. नीता तोरणे, डॉ.वृंदा केळकर, प्रा. तृप्ती फळदेसाई व प्रा, दिप्ती फळदेसाई प्रबंध सादर करतील.

गोवा मुक्तिसंग्राम संस्मरणीय साहित्य या विषयावरील सत्राचे अध्यक्ष डॉ. गोविंद काजरेकर, बांदा महाराष्ट्र असतील तर संपादक परेश प्रभू, डॉ. गीता येर्लेकर, प्रा. श्रद्धा धोंड, प्रा. सारिका आडविलकर, प्रा.पूर्वा वस्त, कु.मानसी वाळवे, कु. प्रणाली सुर्लकर प्रबंध सादर करतील.

तृतीय सत्र गोवा (Goa) मुक्ती संग्राम आणि आत्मचरित्रात्मक लेखन या विषयावर होणार असून या सत्राचे अध्यक्ष डॉ.संजय करंदीकर, मराठी विभाग प्रमुख सयाजीराव गायकवाड विद्यापीठ,गुजरात असतील. तर, प्रा.राधिका नागवेकर, प्रा.आनंद कोळंबकर, प्रा.नवसो परब व प्रा. अंजली नाईक प्रबंध सादर करतील. परिसंवादाचे समारोप सत्र 3.30 ते 4.30 दरम्यान होईल. सूत्रसंचालन प्रा.अंजली नाईक करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT