छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छत्रपती द वॉरियर’

मुष्टीफंडच्या अनिकेत भाटीकर याने बनविला सुंदर खेळ;शिवजयंती सोहळ्यात लोकार्पण
Chatrapati The Warrior
Chatrapati The WarriorDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त, मुष्टीफंड हायस्‍कूल, कुजिरा येथील अनिकेत सुशांत भाटीकर (इयत्ता 8 वी) या विद्यार्थ्याने संगणक प्रणालीच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सुंदर खेळ विकसित केला आहे. या खेळाचे नाव त्यांनी ‘छत्रपती द वॉरियर’ असे ठेवले आहे. हा खेळ स्क्रॅच सॉफ्टवेअर (Software) वापरून तयार केला आहे. स्क्रॅच सॉफ्टवेअर हे नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार इयत्ता 6 वी, 7 वी आणि 8 वी संगणक अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. (Developed a computer game based on the life of Chhatrapati Shivaji Maharaj in goa)

Chatrapati The Warrior
गोव्यात आजपासून शाळा पुन्हा गजबजणार

हा नाविन्यपूर्ण उपक्रम मुख्याध्यापिका सौ. अपर्णा च्यारी, उपमुख्याध्यापिका बिना शंखवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक शिक्षक मयूर मनोहर दळवी व सौ. प्रणिता सावंत यांच्या पुढाकाराने बनविण्यात आला आहे. या खेळाद्वारे काही ठळक ऐतिहासिक घटना व प्रसंग मुलांसमोर येतील. इतिहास घडवणाऱ्यांच्या मांडावळीत आपलेही नाव असावे अशी सुप्त भावना मनात जागृत करण्यासाठी हा खेळ एक माध्यम बनेल. स्क्रॅच सॉफ्टवेअरवरील ‘छत्रपती द वॉरियर’ या खेळाचे शिवजयंती सोहळ्यात लोकार्पण करण्यात आले.

खेळात छत्रपती शिवरायांचा जीवनपट

छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) जीवनपट या खेळाच्या वेगवेगळ्या टप्यांवर येत राहील. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी प्रथम तोरणागड जिंकला होता. असे विविध पॉपअप्स खेळ खेळता येतील. या खेळातून विद्यार्थ्यांमध्ये असलेली इतिहासाची आवड अजून वृध्दिंगत होईल, असे संगणक शिक्षक मयूर मनोहर दळवी यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com