National Open Surfing Competition  Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या शुगरला सर्फिंगमध्ये पदकाची संधी

राष्ट्रीय खुली स्पर्धा : अंतिम फेरीत कर्नाटक, तमिळनाडूच्या सर्फर्सचे आव्हान

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याची शुगर बनारसे हीने राष्ट्रीय खुल्या सर्फिंग स्पर्धेत महिला गटात पदकाची संधी आहे. तिने अंतिम फेरी गाठली असून पदकासाठी कर्नाटक व तमिळनाडूच्या सर्फर्सचे आव्हान मागे सारावे लागेल. स्पर्धा मंगळूर येथील पानांबूर बीचवर सुरू आहे. महिलांच्या खुल्या गटात पर्वरी येथील शुगर हिच्यासह यजमान कर्नाटकची इशिता मालविय व सिंचना गौडा, तमिळनाडूची सृष्टी सेल्वम यांनीही अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय सर्फिंग महासंघातर्फे स्पर्धा घेण्यात आली आहे. (National Open Surfing Competition )

सुवर्णपदकाची दावेदार

प्राथमिक फेरीतील कामगिरीच्या आधारे 16 वर्षीय शुगर महिलांत सुवर्णपदकाची दावेदार आहे. तिने स्पर्धेतील सर्व पंचांना प्रभावित करणारी कामगिरी बजावली व सर्वाधिक गुणांची कमाई केली. अंतिम फेरी गाठलेल्या महिलांत शुगरने 11.27, सृष्टीने 10.37, इशिताने 6.17, तर सिंचना हिने 7.30 गुण नोंदविले. महिलांच्या खुल्या गटासह शुगरने 16 वर्षे व खालील वयोगटातही अंतिम फेरी गाठली आहे.

सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरित

स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्यानंतर शुगरने आपण सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरित असल्याचे सांगितले. ती म्हणाली, ‘‘अंतिम फेरीत जागा पटकावल्याने मी आनंदी आहे. सृष्टी सेल्वम ही गतविजेती आहे. प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान खडतर असल्याची जाणीव आहे, तरीही मी सज्ज आहे आणि उद्या सर्वोत्तम सर्फ करण्याची आशा बाळगून आहे. आम्हाला जास्त स्पर्धात्मक अनुभव मिळावा या हेतूने ही स्पर्धा घेतल्याबद्दल मी भारतीय सर्फिंग महासंघाचे आभार मानते. भविष्यातील प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा लक्षात घेता खूप फायदा झाला आहे.

गतवर्षी रौप्यपदकाची मानकरी

गतवर्षी तमिळनाडूतील कोवालम बीचवर झालेल्या राष्ट्रीय सर्फिंग स्पर्धेत महिलांच्या खुल्या गटात शुगरने रौप्यपदक मिळविले होते. तमिळनाडूची सृष्टी सेल्वम सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain 2025: गोव्यात परतीच्या पावसाचा शेतीला मोठा तडाखा! 4 हजारहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान; डिचोलीला सर्वाधिक आर्थिक फटका

Donald Trump: 'नोबेल मिळाला नाही, आता मी शांततेचा विचार करणार नाही'; ट्रम्प यांचं नॉर्वेला खळबळजनक पत्र, ग्रीनलँडवर ठोकला दावा!

Bicholim Mining Protest: पैरातील लोकांचा खाणीविरोधात पुन्हा एल्गार! साळगावकर खाणीचे कामकाज पाडले बंद; प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक

Pakistani Actress Video: "भारतीय पुरुष पाकिस्तानी मुलींसाठी वेडे...", पाक अभिनेत्रीच्या दाव्याने सोशल मीडियावर वाद, व्हिडिओ VIRAL

Viral Post: "आता तरी गंभीर व्हा!" विजयाचा पत्ता नाही अन् पराभवांचे रेकॉर्ड्स; नेटकऱ्यांनी गौतम गंभीरला धरलं धारेवर

SCROLL FOR NEXT