Goa River Research Dainik Gomantak
गोवा

Goa River Research: मांडवी, झुआरी नद्यांमध्ये येणाऱ्या पाण्यावर NIO करणार संशोधन

सप्टेंबरमध्ये दोन टप्प्यात होणार अभ्यास

Akshay Nirmale

Goa Mandovi, Zuari River Research: गोव्यातील दोना पावला येथे असलेली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी ही संस्था मांडवी आणि झुआरी नद्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अभ्यास करणार आहे.

याच महिन्यात दोन टप्प्यात हा अभ्यास केला जाणार आहे. कॅप्टन ऑफ पोर्ट्स खात्यातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.

(NIO to study discharge in Mandovi, Zuari rivers)

14 सप्टेंबर आणि 22 सप्टेंबर रोजी पणजीतील मत्स्य जेट्टीवर मांडवी नदीवर अभ्यास केला जाईल. झुआरी नदीवर मडगाव मार्गावरील बोरी पुलापासून 200 मीटर खाली भागात हा अभ्यास केला जाणार आहे.

15 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर रोजी केरी येथील तेरेखोल नदीवर तर 17 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर रोजी आरोंदा पुलाखाली 100 मीटरवर हा अभ्यास केला जाईल.

नदीत येणाऱ्या ताज्या पाण्याबाबतचा हा अभ्यास असणार आहे, त्यातून समुद्रात किती प्रमाणात नदीचे पाणी जात आहे, याबाबतही संशोधन करण्यात येणार असल्याचे समजते.

ज्या भागात हे संशोधन केले जाणार आहे त्या भागात या नद्यांवर चालणाऱ्या पर्यटक बोटी, क्रूझ बोटी इत्यादींसह, बार्जेस, प्रवासी लाँच, फेरीबोटी यांच्या मालकांना, चालकांना याबाबत खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.

सावधगिरी बाळगा, सावकाश जा आणि आवश्यकता असल्यास सुरक्षित अंतरावर थांबा, जेणेकरून या अभ्यासात कोणताही अडथळा येऊ नये, असे सांगण्यात आले आहे.

तसेच त्या ठिकाणी तैनात असलेल्या गस्तीनौकांनी ‘ऑन द स्पॉट’ दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासही सांगण्यात आले आहे. वरील सूचनांचे उल्लंघन केल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असे सरकारने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT