National highway vasco dainik Gomantak
गोवा

National Highway: खोदकाम चोहिकडे; रस्ते गेले कुणीकडे? जनता हैराण

National Highway: अपघात, चालकांच्या शारीरिक व्याधींमध्ये वाढ नंदादीप राऊत संतप्त : तक्रार दाखल करणार राष्ट्रीय महामार्ग खोदला; वास्कोत काम पाडले बंद

गोमन्तक डिजिटल टीम

National Highway: वास्को मुंडवेल येथून सार्वजनिक बांधकाम पाणी विभागाचे काम कायदेशीर परवानगी नसताना, राष्ट्रीय महामार्गावर खोदकाम केल्याप्रकरणी मुरगावचे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी काम बंद पाडले.

बार्देश येथील कंत्राटदार ‘केपीएम’ने रस्ता खोदकामाची परवानगी नसताना रस्ता खोदून गुन्हा केल्याचे राऊत यांनी सांगितले.

मुंडवेल कदंबा बसस्थानकाजवळ बेकायदेशीररित्या रस्ता व पदपथ खोदल्याने सार्वजनिक बांधकाम पाणी विभागाच्या संबंधित अधिकारी व कंत्राटदाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी गेल्या आठवड्यात मुंडवेल ते गोवा शिपयार्ड कंपनी पर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाच्या वाहिनीच्या कामाचा शुभारंभ केला होता.

परंतु आमदाराने स्थानिक नगरसेविकेला विश्वासात न घेता, त्यांच्या प्रभागातून जलवाहिनी घालण्याचे काम हाती घेतले आहे.

मुंडवेल, व्होळांत,भोवतेर व गोवा शिपयार्ड परिसरातील घरांना सा.बां. विभागाचा पाणी पुरवठा खूपच कमी प्रमाणात होत आहे.

स्थानिकांच्या गरजा भागवण्यात सरकारला वेळ नाही. मात्र, गोवा शिपयार्ड कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभाग चक्क २५० मिमी. जलवाहिनी बसवून देत असल्याचे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी सांगितले.

प्रभाग १५ मध्ये खूपच कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असताना, स्थानिक लोकप्रतिनिधी गोवा शिपयार्डच्या गरजा भागवत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.दरम्यान, रविवारी सुट्टीचा दिवस असताना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कंत्राटदाराने वास्को मुंडवेल येथील पदपथ व राष्ट्रीय महामार्ग खोदण्यास सुरुवात केली.

गॅसवाहिनीचेही बंद पाडले होते काम

वास्को मुंडवेल भागात अदानी ग्रुपच्या गॅस वाहिनीचे कामही पूर्णपणे बेकायदेशीर असल्याची माहिती राऊत यांनी दिली.सदर गॅस वाहिनीसाठी रस्ता व पदपथ खोदण्यास परवानगी नसताना, वास्को मुंडवेल येथे खोदकाम करण्यात आले होते.

नंतर गॅस वाहिनीच्या कंत्राटदाराने काम बंद केले. गॅस वाहिनी व जलवाहिनी बसविताना संबंधिताने रितसर कागदपत्रे सादर केली नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

धूळ, वाहतूक कोंडीमुळे पणजीवासीय त्रस्त

पणजी, पणजी शहराला भेट देत असताना अनेक ठिकाणी खोदलेल्या रस्त्यांमुळे लोकांची सध्या मोठी गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळी आणि कामाला येजा करण्याच्या वेळी लोकांना वाहतूक कोंडी, धूळ प्रदूषण आणि खडबडीत रस्ते, अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे खोदकाम चालले चोहिकडे, रस्ते गेले कुणीकडे असा प्रश्‍न पडतो.

पणजी या ‘स्मार्ट सिटी’त खडबडीत आणि खोदलेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीची दुर्दशा झाली असून, अनेक वाहनचालकांसह प्रवाशांची रोजची डोकेदुखी बनली आहे. पणजी शहरातील सांतिनेज, ताळगाव, महालक्ष्मी मंदिराजवळील रस्ता आणि इतर ठिकाणचे अनेक अंतर्गत रस्ते खोदकामामुळे धुळीने माखलेले असून, रात्रीच्या वेळेत कार, दुचाकीस्वारांना वाहने सुरळीतपणे चालवणे कठीण झाले आहे.

नियोजनहीन कामांचा प्रत्यय येत असल्याने वारंवार रस्ते खोदण्यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. पण पणजीतील रस्ते वारंवार खोदण्यात येत असल्याने शहरातील लोकांना तसेच पर्यटकांना वारंवार वाहतूक कोंडी,धूळ आणि शारिरीक व्याधी उद्भवत आहेत,आजाराच्या समस्यांनाही तोंड द्यावे लागत आहे. चालकांचा अंदाज चुकत असल्याने किरकोळ अपघातांची संख्याही वाढली आहे.

कधी त्रास संपेल ?

पणजी शहरात वाहनचालकांना कार चालवताना आणि दुचाकीस्वारांना बाईक चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. पणजीत येणाऱ्या पर्यटकांनाही येथील रस्त्यांवरच्या धुळीमुळे अस्वस्थ वाटते, कारण रस्ते मोकळे आहेत, पण धुळीमुळे वाहन चालवणे नकोसे होते.

पणजी शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण कधी पूर्ण होणार, असा प्रश्‍न या खोदकामामुळे नागरिकांना सतावत आहे.

स्मार्ट सिटी कामात अनागोंदी

स्मार्ट सिटी कामासाठी रस्ते खोदल्यानंतर त्या रस्त्यावर पाणी फवारणे सक्तीचे आहे. पण कंत्राटदार सोयिस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करतो.

पणजी शहरात चाललेल्या खोदकामामुळे होत असलेल्या त्रासाने जनता त्रस्त आहे. मात्र लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष आहे.

पणजी शहरातील सांतिनेज भागात खोदलेल्या रस्त्यांमुळे धूळ पसरली असून वाहनचालकांना श्‍वसनाचे आजार जडत आहेत. किरकोळ अपघातही घडत आहेत.

वारंवार चाललेल्या खोदकामामुळे रस्त्यांवर वाहने कलंडण्याचे प्रकारही घडले आहेत. पण कंत्राटदाराकडून या समस्येवर उपाय निघालेला नाही.

पणजी शहरात स्मार्ट सिटी योजनेखाली सुरू असलेले ६० टक्के काम पूर्ण करण्यास ७ वर्षे लागली तर उर्वरित ४० टक्के काम पूर्ण होण्यास आणखी किती वर्षे लागतील, हा प्रश्‍नच आहे. सध्याची कामाची गती पाहिली तरी पुढील दिवाळीपर्यंत तरी ते पूर्ण होण्याची शक्यता अंधूक आहे. गेली अनेक वर्षे काम सुरू असल्याने लोकांना धुळीला सामोरे जावे लागत आहे.

- उदय मडकईकर, नगरसेवक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT